Breaking

Sudhir Mungantiwar : गाव, गरीब और किसान, यह भाजप की है पहचान !

 

Sudhir Mungantiwar said only BJP can build a worker Nitin Gadkari who build road that goes beyond Japan : जापानच्याही पुढे जाणारा रस्ता बनवनारा कार्यकर्ता भाजपच घडवू शकतो

Chandrapur : आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते देशासाठी जीव तोडून काम करतात. त्यांचे हात मजबूत करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यासाठी आपला पक्ष मजबूत झाला पाहिजे. आपल्या वार्डात, प्रभागात, गावात, शहरात सर्वत्र भाजपच्या विचारांचा प्रकाश आपल्याला पोहोचवायचा आहे. ही मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. त्यासाठी सर्वांनी संकल्प करुया, असे आवाहन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त आज (६ एप्रिल) सुधीर मुनगंटीवार कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. ते म्हणाले, आपले जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा म्हणाले की, ‘त्याग, तपस्या और बलीदान , यह भाजप की सही पहचान.’ ते योग्यच म्हणाले. पण आता आपल्याला त्याच्याही एक पाऊल पुढे जावे लागेल आणि ‘गाव, गरीब और किसान, यह भाजप की है पहचान’, यासाठी काम करावे लागेल.

Sudhir Mungantiwar : चंद्रपूरमध्ये माता महाकाली यात्रेची सुरुवात; मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे यात्रेकरुंना मिळणार उत्तम सुविधा

कार्यकर्ता भाजपच घडवू शकतो..
परिवारवाद आपल्या पक्षात नाही. चहा विकणारा कार्यकर्ता देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचतो, हे भाजपमध्येच होऊ शकते. सन १९८९ मध्ये नागपुरातील महालच्या अरुंद रस्त्यांवर पक्षाचा विचार घेऊन लुनावर फिरणारा एक कार्यकर्ता नितीन गडकरी या देशाचे एक्सप्रेस मॅन झाले. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रस्त्यांवर आज विमानंही लॅंड होऊ शकतात. जापानच्याही पुढे जाणारा रस्ता बनवनारा कार्यकर्ता भाजपच घडवू शकतो, असे मुनगंटीवार म्हणाले.

विषारी विचारांवरील फवारणी..
आज राज्यात, देशात आपले सरकार आहे. पण स्वार्थासाठी द्वेशाचं बिज पेरणाऱ्यांची संख्या वाढते आहे. या विषारी विचारांवर एकच फवारणी आहे. ती म्हणजे पक्षाचा विस्तार. सर्व जातीधर्मांच्या कार्यकर्त्यांना, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मुस्लीम सर्वांना एकत्र करायचं आहे. महाराष्ट्रात सदस्य अभियान नोंदणीत पक्षाचे नवीन दीड कोटी सदस्य झाले आहेत. १८८ टक्के टारगेट पूर्ण करणारा वाघाचा मतदारसंघ आपला बल्लारपूर विधानसभा आहे. त्यामुळे आता आपली जबाबदारी आणखी वाढली आहे.

Minister Ashish Shelar : मंत्री म्हणून जनसेवकाचा आदर्श सुधीरभाऊंनी निर्माण केला!

चलो जलाये दिप वहां..
आपल्याला बुथनिहाय उत्तम कार्य करण्यासाठी जोमाने कामाला लागायचे आहे. प्रत्येकाला पक्ष आपला वाटला पाहिजे. मोबाईलच्या युगात पक्षाचा विस्तार करताना तंत्रज्ञानाची माहिती घेतली पाहिजे. आपण आपले तंत्र विकसीत केले पाहिजे. ‘चलो जलाये दिप वहां, जहा अभी भी अंधेरा है..’, हे फक्त गीत नाही, शब्दांचा संचय नाही, तर हा भाव आहे. त्यामुळे भाजपच्या विचारांचा प्रकाश आपल्याला ठिकठिकाणी पोहोचवायचा आहे, असे आमदार मुनगंटीवार म्हणाले.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी गाजवले अर्थसंकल्पीय अधिवेशन !

बल्लारपूर कार्यकर्त्यांचे योगदान..
आज काही राजकीय पक्ष जातीयवाद, परिवारवाद पसरवत आहेत. भाजपच्या विचारात याला कुठेही मान्यता नाही. आपल्या विचारात राष्ट्रवाद, विकासवाद, मानवतावाद हा आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आपला देश जगाचा कर्णधार होणार आहे. यामध्ये आपला बल्लारपूर कुठे असणार, हे आपल्या कार्यकर्त्यांनी आजच ठरवायचे आहे. भारताच्या विकासात बल्लारपूरच्या कार्यकर्त्यांचे योगदान असलेच पाहिजे, असेही ते म्हणाले. ‘ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो..’, या भावनेने काम करण्याची गरज प्रतिपादीत करत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तमाम कार्यकर्त्यांना रामनवमी आणि भाजपच्या स्थापना दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.