Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार म्हणाले शंकरपट स्पर्धेला राजाश्रय देण्याची गरज!

Sudhir Mungantiwar says, give royal protection to Shankarpat : अनुदानावरील मागण्यांच्या चर्चेदरम्यान केली सूचना

Mumbai : आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट हा खेळ अत्यंत लोकप्रिय आहे. त्याचप्रमाणे, आपल्या देशात कबड्डी आणि इतर पारंपारिक खेळांना महत्त्व आहे. विदर्भातही शंकरपट हा खेळ मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे.या पारंपारिक खेळाच्या जतन आणि संवर्धनासाठी शंकरपटाला राजाश्रय मिळावा, अशी मागणी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

काल (१७ मार्च) अनुदानावरील मागण्यांच्या चर्चेदरम्यान बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ज्या प्रकारे आपण तालुका ते राज्यस्तरापर्यंत क्रीडा प्रदर्शन आणि स्पर्धांचे आयोजन करतो, त्याचप्रमाणे शंकरपट या पारंपारिक खेळाच्या स्पर्धाही तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्तरावर आयोजित केल्या पाहिजेत.क्रिकेटच्या सामन्यांमध्ये भारतीय संघ जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात विजय मिळवतो, तेव्हा आपण त्यांचे कौतुक करतो आणि त्याचा अभिमान बाळगतो. मात्र, त्याचसोबत आपली पारंपरिक कृषी आणि ग्रामीण जीवनशैलीशी जोडलेली शंकरपटासारखी क्रीडा परंपरा आपण जपली पाहिजे. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या खेळाला प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे.

Eknath Shinde : औरंगजेबाचे गोडवे गाणारे देशद्रोहीच!

गेली काही वर्षे शंकरपटावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली होती. वनमंत्री असताना आम्ही न्यायालयात बाजू मांडून मान्यता मिळवून दिली. त्यामुळे आता या खेळाला कृषीमंत्र्यांनी राजाश्रय मिळवून द्यावा, अशी सूचना आमदार मुनगंटीवार यांनी केली. यासंदर्भात संबंधित विभागाने जे उत्तर दिले, ते योग्य वाटत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

काय आहे शंकरपट ?
जगाच्या पोशिंद्यासाठी बैल राबतात. शेतकऱ्यांना शेतीच्या कामांपासून जेव्हा उसंत मिळते. त्या काळात शंकरपट भरवला जातो. यामध्ये बैलांच्या शर्यती होतात. विदर्भात याला शंकरपट म्हणतात. तर पश्चीम आणि उत्तर महाराष्ट्रात या खेळाला बैलगाडा शर्यत म्हणतात. बैलगाडा शर्यत आणि शंकरपटाचे नियम वेगवेगळे आहेत. बैलगाडा शर्यतीत एका वेळी सात ते नऊ गाड्या सोडल्या जातात. तर शंकरपटात एका वेळी एक किंवा फारच फार दोन गाड्या सोडल्या जातात. एक गाडी सोडल्यास ही स्पर्धा सेकंदावर होते. तर दोन गाड्या सोडल्यास पहिले पोहोचलेली गाडी विजयी ठरते.

Sudhir Mungantiwar : चंद्रपुरातील फर्निचर अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पोहोचवू!

शंकरपटाची विदर्भात जवळपास ३०० वर्षांपासूनची परंपरा आहे. विदर्भात मुख्यत्वे अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, उमरखेड, अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथे शंकरपट भरतो. हा फक्त खेळच नाही जगाच्या पोशिंद्याची परंपरा असल्याचे जुनेजाणते शेतकरी सांगतात.