Sudhir Mungantiwar : चंद्रपूरला निधी मिळण्याचे ते दिवस गेले, मुनगंटीवार पुन्हा मंत्री व्हावे यासाठी गणरायाला साकडे !

The days of getting funds for Chandrapur are over : कर्तृत्वाने जनमाणसांत निर्माण केली वेगळी प्रतिमा

Chandrapur : एखाद्या नेत्याने जनतेच्या मनात काय स्थान मिळवले, हे त्याच्या कर्तृत्वाने सिद्ध होते. नेत्यासाठी जनता देवाला साकडे घालते, तो नेता खरा भाग्यवान. असेच एक लोकनेते म्हणजे राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने जनमाणसांत आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. प्रत्येक सणासुदीला जनता त्यांच्यासाठी देवाकडे आशीर्वाद मागते. काल (२७ ऑगस्ट) मोठ्या धुमधडाक्यात गणरायाचे आगमन झाले. त्यांच्या एका चाहत्याने सुधीर मुनगंटीवार पुन्हा मंत्री व्हावे, यासाठी गणरायाला साकडे घातले आहे.

सावली (जिल्हा चंद्रपूर)येथील राकेश विरमलवार या चाहत्याने सुधीर मुनगंटीवार पुन्हा मंत्री व्हावे, यासाठी बाप्पाला प्रार्थना केली. तशी प्रतिक्रिया सोशल मिडियावर कमेंटच्या माध्यमातून त्यांनी टाकली आहे. यामध्ये ‘सरकारमध्ये सुधीर भाऊ मंत्री नाहीत, हे वाटतच नाही. पण जनतेमध्ये एकच चर्चा आहे की, विकास धोरण राबवणारे मंत्री म्हणून सुधीर भाऊच पुन्हा मंत्री होणार. त्याच जोमाने पुन्हा झंजावात सुरू होईल, हीच गणेचरणी प्रार्थना. इतके कोटी मंजूर, तितके कोटी मंजूर, अशा बातम्या पुन्हा झळकू दे. ते मंत्री असताना जिल्ह्याच्या विकासासाठी मोठा निधि यायचा, तो तसाच कायम रहावा यासाठी सुधीर मुनगंटीवार मंत्री आवश्यक आहे…’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

Sudhir Mungantiwar : आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी गणेश प्रतिष्ठापना

 

सुधीर मुनगंटीवार ज्या खात्याचे मंत्री होतात, ते खाते नावारूपास येते. अर्थ, वन,सांस्कृतिक कार्य, मत्स्य विभाग मुनगंटीवारांनी त्यांच्या कतृत्वाने प्रसिद्धीच्या झोतात आणले. त्यांनी केलेल्या विकास कामांची यादी लांबलचक आहे. ते जेव्हा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते, तेव्हा जिल्हाला मोठा निधि येतं होता,विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याच्या बातम्या झळकत होत्या. आता ते मंत्रिमंडळात नाहीत. त्यामुळे अशा बातम्या दिसेनाश्या झाल्या आहेत. जिल्ह्याला हजारो कोटी रुपयांचे निधी मिळण्याचे ते दिवस गेले,अशा चर्चा नागरिकांमध्ये होत आहेत. त्यामुळेच आपला लाडका नेता पुन्हा मंत्री व्हावा, यासाठी मुनगंटीवारांचे चाहते गणरायाला साकडे घालत आहेत.