The hunger strike of the Reservation Rescue Struggle Action Committee has been going on for eight days : आठ दिवसांपासून आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे उपोषण सुरू
Chandrapur Bank : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने नोकर भरतीमध्ये आरक्षण संपवण्याचा चंग बांधला आहे. याविरोधात विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत. त्यांनी यासंदर्भातील आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. याच मागणीसाठी आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे मनोज पोतराजे यांनी ८ दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. दरम्यान राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपोषण स्थळाला भेट दिली.
यासंदर्भात आमदार मुनगंटीवार म्हणाले, उपोषणकर्ते मनोज पोतराजे, त्यांचे सहकारी आणि विद्यार्थ्यांनी भाजपचे महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांना निवेदने दिली. त्यावरून हे प्रकरण लक्षात आले. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक कुणाच्या मालकीची नाही. संचालक मंडळ बॅंकेच्या नोकर भरतीत आरक्षणच ठेवणार नाहीत, तर हे चालणार नाही. संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे. आणि याच वेळी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, एनटी, ओबीसींचे बॅंकेतील आरक्षण संपवले जात आहे. धक्कादायक म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी ३० टक्के आरक्षण ठेवले जात आहे. ‘नारी से नारायणी तक’ हा नारा दिला जात आहे.
Bicycle rally : सायकल रॅलीतून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश
सहकार विभागाला विद्यार्थ्यांनी निवेदने दिली. पण त्यांचा आवाज ऐकला जात नाहीये. मनोज पोतराजे व त्यांच्या सरकाऱ्यांना उपोषणाला बसून आज ८ दिवस झाले. ते स्वतःसाठी काही मागायला उपोषणाला बसलेले नाहीत, तर आरक्षण वाचवण्यासाठी बसलेले आहेत. विद्यार्थी नियमानुसार परीक्षा द्यायला तयार आहेत. पण परीक्षा घेणाऱ्या संस्थेवर त्यांचा आक्षेप आहे. यावर सहकार विभागाने काहीही कार्यवाही केली नसेल, तर ही बाब गंभीर आहे. उपोषणकर्त्यांचे काही कमीजास्त झाले, तर जबाबदारी कुणाची, असा सवाल आमदार मुनगंटीवार यांनी केला.
Social welfare department : प्रजासत्ताक दिनी ‘घर घर संविधान’!
आरक्षणाच्या विरोधात काही घडत असेल तर त्यासाठी कुणी लढायचे नाही का? प्रशासनाची ही चालढकल योग्य नाही. आता आमचे महानगर अध्यक्ष डॉ. राहुल पावडे यांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्यायला सांगितले आहे. यावर काय तोडगा निघतो, ते बघावे लागेल, असेही आमदार मुनगंटीवार म्हणाले. एकंदरीतच चंद्रपूर जिल्हा बॅंकेत सुरू असलेल्या या प्रकाराबाबत ते गंभीर झाले आहेत. पोतराजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपोषणाचे काय फलित निघते, हे बघावे लागणार आहे.