Breaking

Sudhir Mungantiwar : कामगारांच्या सुरक्षेसाठी कायदे कडक करा !

 

Tighten laws for worker safety : आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून वेधले सभागृहाचे लक्ष

Chandrapur : जनतेच्या विविध प्रश्नांसाठी सदैव तत्पर असलेले राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकुशलतेची प्रचिती राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा दिसून येत आहे. कामगारांच्या सुरक्षेसाठी आज (६ मार्च) त्यांनी पुढाकार घेऊन लक्षवेधी मांडली.

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी येथील धारीवाल इंफ्रास्टक्चर कंपनीमध्ये अपघातात कामगार दगावल्याच्या घटना घडल्या. या संदर्भात कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आमदार मुनगंटीवार यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहाचे लक्ष वेधले. त्यांच्या लक्षवेधीवर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी उत्तर दिले. या उत्तरात त्यांनी चंद्रपूर येथील कंपनीतील अपघातात सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली नसल्याचे मान्य केले. त्यांनी यासंदर्भात औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आल्याचेही सांगितले.

Sudhir Mungantiwar : चंद्रपूरचे प्रदूषण : मुनगंटीवारांचा प्रश्न अन् सीएसटीपीस, वेकोलिची गॅरेंटी जप्त

कामगार बांधवांची सुरक्षा महत्वाची आहे. त्यासाठी राज्य सरकारने कडक कायदे करणे आवश्यक असल्याचे मत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. अपघातात जीव गमावलेल्या कामगारांना आर्थिक मदतीसाठी भारतीय मजदूर संघाला आंदोलन करावे लागल्याचेही त्यांनी सभागृहाला सांगितले. कामगारांच्या सुरक्षेबाबत होत असलेला हलगर्जीपणा थांबविण्यासाठी या विषयावर बैठक घेत सविस्तर चर्चा करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. आमदार मुनगंटीवार यांनी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना चंद्रपूर येथे आमंत्रित केले आहे.