Union Minister of State for Sports Raksha Khadse will come to Chandrapur for the first Time : आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला विशेष आग्रह
Chandrapur : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्यावतीने आयोजित 26 व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे तालुका क्रिडा संकुल, विसापूर जिल्हा चंद्रपूर येथे येत आहेत. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या आग्रहामुळे त्या प्रथमच चंद्रपूरला येत आहेत, हे विशेष.
20 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 4.30 वाजता तालुका क्रीडा संकुल विसापूर येथे 26 व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे विसापूर येथील भव्य क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यासोबतच यावेळी अनेक मान्यवरांचीही उपस्थिती राहणार आहे.
Sudhir Mungantiwar : आमदार मुनगंटीवारांनी दिले चंद्रपूर-गडचिरोलीच्या तरूणांच्या स्वप्नांना पंख !
राज्यातील विद्यापीठ क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी हा महोत्सव अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. राज्यभरातील खेळाडूंना आपली कौशल्ये सादर करण्याची संधी आहे. मिशन ऑलिम्पिक 2036 साठीही ही स्पर्धा निश्चितच उपयुक्त ठरेल. 26व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना मोठे प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.