Breaking

Sudhir Mungantiwar : घरकुल योजनेचे काम प्रभावी व समन्वयाने करा !

Accelerate the work of the Pradhan Mantri Awas Yojana : अंमलबजावणी गतिमान, परिणामकारक आणि सुनियोजितपणे व्हावी

Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर मतदारसंघातील घरकुलांच्या कामांना गती देण्याचे निर्देश राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिले. वडीलांच्या नावाने घरकुल मंजुर झाले असेल आणि ते वयस्कर असल्यामुळे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध होण्यास अडचण येत असेल तर मुलाचे जातीचे प्रमाणपत्र व तत्सम कागदपत्रांच्या आधारे घरकुल मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, ही महत्वाची सुचना त्यांनी आढावा बैठकीत दिली.

ग्रामीण व शहरी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई, शबरी घरकुल योजना तसेच राज्यस्तरीय योजनांच्या माध्यमातून हजारो लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहेत. या योजनांची अंमलबजावणी अधिक गतिमान, परिणामकारक आणि सुनियोजित व्हावी, तसेच बल्लारपूर मतदारसंघ घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श ठरावा, यासाठी प्रभावी व समन्वयाने काम करा, अशाही सुचना आमदार मुनगंटीवार यांनी दिल्या.

Sanjay Gaikwad: बाळासाहेब जिवंत असताना शिवसेना 70-74 जागांच्या पुढे जात नव्हती

बल्लारपूरच्या शासकीय विश्रामगृहात झालेल्या आढावा बैठकीला भाजपचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, शहराध्यक्ष रणंजय सिंग, सतीश कणकम, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, उपविभागीय अधिकारी अजय चरडे, तहसीलदार बल्लारपूरच्या रेणुका कोकाटे, मुलच्या तहसीलदार मृदूला मोरे, बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ, संदीप दोडे (मुल), निखिल लांडगे (पोंभुर्णा), संवर्ग विकास अधिकारी (चंद्रपूर) संगीता भांगरे, धनंजय साळवे (बल्लारपुर), विवेक बेलालवार (पोंभुर्णा), अरुण चनकणे (मुल), बल्लारपूर वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घोरुडे आदींची उपस्थिती होती.

Ashadhi Ekadashi 2025 : अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर ||

घरकुल योजनांतर्गत मंजूर झालेल्या हजारो लाभार्थ्यांना भेडसावत असलेल्या निधीचा विलंब, तांत्रिक अडचणी, अपूर्ण बांधकाम व जागेच्या समस्यांसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून घरकुलाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याच्या सुचना आमदार मुनगंटीवार यांनी दिल्या. ते म्हणाले, शबरी आवास तसेच पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर घरकुल योजनेबाबत संबंधित संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेण्यात यावी. विशेषतः पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेत लाभार्थी संख्या कमी असूनही मंजुरी संख्या अधिक असल्यामुळे या विषयावर आढावा बैठक आयोजित करण्यात यावी.