Breaking

Sudhir Mungantiwar : प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी मुनगंटीवारांचा लढा यशस्वी

Important meeting chaired by Industries Minister Uday Samant at Vidhan Bhavan : उदय सामंत यांची सकारात्मक भूमिका, संबंधित अधिकाऱ्यांना दिले स्पष्ट निर्देश

Mumbai : चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील अरबिंदो रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीसंदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या आणि प्रलंबित मागण्यांबाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हा विषय सातत्याने लाऊन धरला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आमदार मुनगंटीवार यांची धडपड पुन्हा एकदा बघायला मिळाली. विधान भवनात झालेल्या बैठकीत अरबिंदो कंपनीकडून शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहे, त्यावर सविस्तर चर्चा झाली. उदय सामंत यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. यामध्ये जमीन अधिग्रहणासाठी ठोस कालमर्यादा निश्चित करणे, अधिग्रहण करताना नुकसान भरपाईची संपूर्ण जबाबदारी कंपनीवर राहील. रोजगारात स्थानिकांना ८० टक्के प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

Sudhir Mungantiwar : शिवरायांच्या किल्ल्यांचा जागतिक सन्मान, मुनगंटीवारांच्या अंगरक्षकाची रायगडावर सायकलवारी!

पुढील अधिवेशनापर्यंत या मागण्या पूर्ण न झाल्यास कंपनीवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. या बैठकीला आमदार सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि गावकरी उपस्थित होते.

MLA Sudhir Mungantiwar : आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या ऐतिहासिक प्रस्तावावर जागतिक मोहोर!

आमदार मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे झालेले निर्णय –
– सदरील बैठकीत १२५ एकर शेतकऱ्यांची जमीन खरेदी करून यासंदर्भात शेतकरी व आमदार महोदयांसमवेत चर्चा करून उर्वरित समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांना उद्योग मंत्री यांचे निर्देश
– ३७५ एकर जमीन सप्टेंबरपर्यंत खरेदी करणार व उर्वरित ३७५ एकर जमीन डिसेंबर पर्यंत तीन टप्प्यात खरेदी करणार
– माजी सैनिकांचा विषय व्यक्तिशः बोलून मार्ग काढण्यात येईल
– सुरक्षा रक्षक स्थानिकच भरले पाहिजेत याबाबतचे आदेश मंत्री महोदयांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकाऱ्यांना यांना दिले
– सुरक्षा रक्षक भरतीसाठी कंपनी प्रशासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला पत्र देणे व मागणी करणे
– जमीन खरेदी करताना झाडे, बोरवेल आदींची नुकसान भरपाई कंपनी प्रशासनाने दिली पाहिजे असे आदेश मंत्री उदय सामंत यांनी अरबिंदो रियालिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला दिले.