Breaking

Sudhir Mungantiwar : आमदार मुनगंटीवार कडाडले; म्हणाले, केवळ अधिवेशन काळापूरतेच निलंबन का?

MLA Mungantiwar got angry and said, why the suspension only for the duration of the session? : अबू आझमीच्या निलंबनानंतरही संतापले; म्हणाले, प्रस्तावात आणखी काही बाबींचा समावेश करा

Mumbai : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष साजरे करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला. लंडनच्या संग्रहालयातून महाराजांची वाघनखे भारतात आणली. छत्रपतींचे कार्य, विचार सर्वदूर पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम राबवले, असे राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार अबू आझमीच्या ‘त्या’ वक्तव्याबाबत आजही चांगलेच संतापले.

आज (५ मार्च) सभागृहात अबू आझमींच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतरही आमदार मुनगंटीवार यांचा संताप कमी झाला नाही. मंत्री चंद्रकांत पाटलांनी आझमींच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर आमदार मुनगंटीवार सभागृहात उभे झाले आणि जोरदार भाषण केले. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना आपण देव किंवा देवासमान मानतो. अशा आपल्या देवाचा अपमान अबू आझमींनी केला आहे. आणि त्यांचं निलंबन हे फक्त अधिवेशन संपेपर्यंतच का, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

Assembly Budget Session : वैद्यकीय अधिकारीच नाहीत, रुग्णांचे किती हाल करणार?

औरंगजेब लुच्चा, लफंगा होता..
औरंगजेब हा लुच्चा आणि लफंगा होता. शहाजहानने सांगितलं होतं की उन्हाळा वाढला आहे. माझं प्यायचं पाणी वाढवा, तेव्हा लुच्चा लफंगा औरंग्या म्हणाला होता की, जिंदा रहना है तो रहो नही तो मर जाओ. जो स्वतःच्या बापाला असं म्हणतो, त्याच्याबाबत अबू आझमी असं कसं काय बोलू शकतात? त्याची भलावण अबू आझमी कशी काय करतात, असे सवाल आमदार मुनगंटीवार यांनी उपस्थित केले.

आयुधाची मर्यादा बाळगू नये..
छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अपमान यासाठी कुठलंही आयुध लागणार नाही. मी चंद्रकात पाटील यांना सांगू इच्छितो की प्रस्तावात बदल करा. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज याचा अपमान झाल्यास कुठल्याची आयुधाची मर्यादा बाळगू नये. आमचा आदर्श शिवाजी महाराज आहेत, असे आमदार मुनगंटीवार यांनी ठणकावून सांगितले.

Assembly Budget Session : एकाच प्रश्नावर सत्ताधारी-विरोधकांनी मंत्र्यांना धरले धारेवर!

निलंबन दीर्घ काळासाठी करावं..
छत्रपतींचा अवमान करणारा औरंग्या आणि त्याची भलावण करणारे अबू आझमी यांचे निलंबन दीर्घ काळासाठी करावे, अशी मागणी आमदार मुनगंटीवार यांनी केली. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात प्रस्ताव मांडल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सदस्यांचा कौल घेतला. त्यानंतर अबू आझमींचं निलंबन करण्यात आलं. पण आमदार मुनगंटीवार या निलंबनाने समाधानी दिसले नाही.