Sudhir Mungantiwar : आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी गणेश प्रतिष्ठापना

Prayer to Lord Ganesha for farmers, agricultural laborers and public welfare : शेतकरी, शेतमजूर व जन कल्याणासाठी गणरायाच्या चरणी प्रार्थना

Chandrapur : राज्याचे माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने चंद्रपूर येथील आपल्या निवासस्थानी सहकुटुंब गणेश प्रतिष्ठापना करून पूजन केले. सकाळपासूनच घरामध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. विधिवत मंत्रोच्चारात झालेल्या प्रतिष्ठापनेनंतर गणरायाचे स्वागत करताना मुनगंटीवार कुटुंबीयांबरोबर कार्यकर्ते आणि शुभेच्छुक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेशोत्सवानिमित्त आपल्या शुभेच्छा संदेशात आ. मुनगंटीवार म्हणाले “श्री गणरायाचे आगमन हे केवळ सणाचे स्वरूप धारण करणारे नाही; तर ते विघ्ने दूर करून सुकरतेकडे नेणाऱ्या नव्या प्रवासाची सुरुवात आहे. श्रींच्या आगमनाने संपूर्ण घर भक्तिभावाच्या दिव्य लहरींनी न्हाऊन निघाले आहे. महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, दीन-दुर्बल व पीडित जनतेच्या कल्याणासाठी अखंड सेवा करण्याची शक्ती लाभो, अशी मी प्रार्थना श्रींच्या चरणी करतो. महाराष्ट्र सदैव सुजलाम्-सुफलाम् राहो हीच मनोकामना आहे.”

Ganeshutsav 2025 : ‘गणपती बाप्पा मोरया’ चा जयघोष देशभरात उत्साह !

यावेळी त्यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देत असेही म्हटले “विघ्नहर्ता श्री गणेशाच्या मंगल आगमनाने आपल्या जीवनात आनंद, समाधान, समृद्धी आणि सुखाचा वर्षाव होवो. गणपती बाप्पा आपल्या मार्गातील सर्व अडथळे दूर करून यशाचा मार्ग सुकर करो. या पवित्र उत्सवात आपल्या कुटुंबियांसह व मित्रपरिवारासह आनंद साजरा करूया आणि आपली संस्कृती जपणारी ही सुंदर परंपरा अधिक दृढ करूया.”

Nagpur’s Ganesh festival : गणेशोत्सवात बंदोबस्तासाठी ‘एआय’, मंडळांना सीसीटीव्ही बंधनकारक !

दर्शनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी श्रींच्या चरणी नमस्कार करत दर्शन घेतले. “गणपती बाप्पा मोरया!” या जयघोषात मुनगंटीवार परिवाराने गणेशोत्सवाचा शुभारंभ केला.