Breaking

Sudhir Mungantiwar : मराठीच्या मुद्यावर दूर दूरपर्यंत कुठलेही राजकारण नाही !

There was no politics on the Marathi issue, the committee appointed by Uddhav Thackeray had recommended it : मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी नियुक्त केलेल्या समितीनेच तशी शिफारस केली होती

Nagpur : त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी भाषा पाचव्या वर्गानंतर सक्तीची आहे. पहिलीपासून मराठी व इंग्रजी सक्तीची होती. त्यासोबत बालवयातच तिसरी भाषा सहज शिकता येते म्हणून तशी शिफारस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी नियुक्त केलेल्या समितीनेच केली होती. मराठी आणि इंग्रजीसोबत हिंदी पहिल्या वर्गापासून शिकवल्या गेली, तर ती सहज शिकता येते. यात मराठीचा काय संबंध, असा सवाल राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याचे कामकाज काल (४ जुलै) आटोपले. त्यानंतर आज नागपुरात आले असता आमदार मुनगंटीवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, मराठी माणसांनी इंग्रजी शिकणे म्हणजे अभिमान, पण मराठी माणसांनी हिंदी शिकणे म्हणजे मराठीचा अवमान कसा, हे अद्याप मला समजलं नाही. कदाचित आणखी ५०- १०० पुस्तकं वाचल्यावर लक्षात येईल.

Sanjay Raut vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील कच्चं मडकं, संजय राऊत कडाडले

उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एक येण्याबद्दल विचारले असता, ते दोघे एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट आहे आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. दोघे भाऊ एकत्र यावे, एकत्र रहावे आवश्यकता असेल तर दोन्ही पक्षांचा मिळून एक पक्ष करावा. आमची काही हरकत नाही. पण मी न्यूज चॅनलवर ऐकलं आहे की, दोन्ही भाऊ एकत्र आले तर त्यांच्यासोबत जायचं नाही, अशी काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे या मुद्याचा निवडणुकीत किती फायदा होईल, याचा विचार केल्यापेक्षा अशा वातावरणात कारण नसताना राज्यात गैरसमज पसरत आहेत, ते होऊ नये, हे पाहणे अधिक महत्वाचे आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात..’चा नारा लावला. यामध्ये वादंग करण्याचं काय कारण आहे, असा सवाल त्यांनी केला. आपण राष्ट्रगीत म्हटल्यानंतर जय म्हणतो तेव्हा भारत माता की जय म्हणत असताना गुजरातचेही जय होत नाही का? हे कोणाचे आणि कोणते सुपर ब्रेन आहे, हे कळत नाही. एका सिनेमामध्ये सनी देओलला ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणायला सांगितलं जातं, तो म्हणतोसुद्धा. कारण यामध्ये काहीच अडचण नाहीये. पण माझ्या देशाबद्दल गैर शब्दांचा उपयोग केला, तर ते सहन होणार नाही, असा इशारा आमदार मुनगंटीवार यांनी दिला. जय गुजरात म्हटल्याने आपण छोटे होतो का? जय महाराष्ट्र म्हटल्यानंतर त्यांनी जय गुजरात म्हटलं येवढंच. त्यासाठी वादंग करणारे संकुचित वृत्तीचे लोक मी आजवर नाही बघितले, असेही ते म्हणाले.

Mul bus depot : मुल बस आगारासाठी सोमवारी मंत्रालयात बैठक, मुनगंटीवारांचे आणखी एक यश !

आमदार मुनगंटीवार यांनी काल ३० विधेयक सभागृहात सादर केले. त्यावर ३० अशासकीय विधेयकांत त्यामधील कायद्यातील सुधारणा असतील. त्याच्यावर चिंतन होईल, असे ३० अशासकीय विधेयक मांडले आहेत. अजून चार विषय राहिले आहेत, ते पुढील आठवड्यात येतील. कायद्यावरील चर्चा होणे गरजेचे आहे, असे आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले.