Suicide of Sampada Munde : संपदा मुंडेची आत्महत्या ओबीसी समाजासाठी हळहळजनक !

Chief Minister Devendra Fadnavis should immediately constitute an SIT : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ एसआयटी स्थापन करावी

Nugpur: स्वातंत्र्यानंतर आज ७५ वर्षांनी ओबीसी समाजातील अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर, आयटी क्षेत्रात, तसेच आयएएस आणि आयपीेससारख्या पदांवर पोहोचले आहेत. अशात एका उच्चशिक्षीत ओबीसी मुलीला अत्याचाराला आणि मानसीक छळाला कंटाळून आत्महत्या करावी लागणं, ही संपूर्ण समाजासाठी हळहळजनक आणि धक्कादायक बाब आहे, असे प्रतिक्रिया राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणावर दिली.

यासंदर्भात आज नागपुरात (२५ ऑक्टोबर) पत्रकारांशी बोलताना डॉ. तायवाडे म्हणाले, सरकारी नोकरी करत असताना संपदा मुंडे हिच्यावर अत्याचार करण्यात आले, तिचा मानसीक छळ करण्यात आला. त्यातूनच तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. ही घटना ओबीसी समाजासाठी अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ एसआयटी स्थापन करावी. गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांनी त्यांनी स्वतः या प्रकरणात हस्तक्षेप करून जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.

Cidco Land Scam : वनविभागाचे कबुलीपत्र, रोहित पवारांच्या आरोपांना दुजोरा

ओबीसी समाजातील सर्व जाती-धर्मातील लोकांनी अशा प्रकारच्या मानसीक छळाच्या घटनांचा एकमुखाने निषेध केला पाहिजे, असे आवाहन डॉ. बबनराव तायवाडे यांनी केले. तरुण पिढी ही देशाचे भविष्य आहे. त्यामुळे या पिढीच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी समाजातील प्रत्येकाने सजग असले पाहिजे, असेही डॉ. तायवाडे म्हणाले.

Babanrao Taywade : राजकीय पक्षांनी बोगस ओबीसींना उमेदवारी देऊ नये !

संपदासारख्या हुशार आणि कष्टाळू मुलीला जर अन्यायाचा सामना करावा लागत असेल, तर ही समाज आणि प्रशासन दोघांसाठी लज्जास्पद बाब आहे. आपल्या समाजातील मुली शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधण्याचा प्रयत्न करत असताना, त्यांच्या भावनांशी आणि भविष्याशी खेळ करणाऱ्यांना माफी मिळता कामा नये. ही आत्महत्या नसून व्यवस्थेतील अन्याय आणि सरकारी उदासीनतेचा परिणाम असल्याचा आरोप डॉ. तायवाडे यांनी केला.