Sukesh Zanwar : बुलढाणा अर्बनची धुरा नव्या कर्णधाराकडे !

 

Buldhana Urban got new leadership : अध्यक्षपदी डॉक्टर सुकेश झंवर यांची अविरोध निवड

Buldhana बुलडाणा अर्बन या नावातच ग्राहकांचा विश्वास सामावलेला आहे. राधेश्यामजी चांडक उपाख्य भाईजी यांच्या कल्पकतेतून बुलडाणा अर्बनला ख्याती प्राप्त झाली. बुलडाणा अर्बनचा हा सेवारथ याच विश्वासाने सहृदयतेच्या बळावर आणखी पुढे नेणार, अशी ग्वाही नव्यानेच निवड झालेले बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर यांनी दिली आहे.

संस्थेचे अध्यक्ष म्हणून डॉ.सुकेश झंवर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बुलडाणा अर्बनने कायम ग्राहक सेवा व सभासद हिताला प्राधान्य दिले आहे. १५ ऑगस्ट १९८६ साली राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांनी संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. सातत्याने नव्या – नव्या कल्पना मांडल्या. सहकाराचा शब्द, संयम, वेळ आणि समर्पण या चतु:सूत्रीवर काम केले. त्यामुळे भाईजींच्या नेतृत्वात बुलडाणा अर्बनने ‘सहकाराचा गोवर्धन’एक हाती उचलून धरला आहे.

ST fair hike : शिवसेनेचे भाडेवाढ विरोधात चक्काजाम आंदोलन

 

बुलढाणा अर्बनची धुरा आता नव्या कर्णधाराकडे सोपवण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे संस्थेचे सीएमडी म्हणून काम करत असलेले डॉक्टर सुकेश झंवर यांची अविरोध निवड पार पडली आहे. राधेश्याम चांडक (भाईजी) यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे. २७ जानेवारी रोजी ही निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी( बुलडाणा) डॉ.किरण पाटील होते. तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नानासाहेब चव्हाण (जिल्हा उपनिबंधक बुलडाणा ), सहाय्यक निबंधक गजानन आमले व महेश कृपालानी यांनी काम पाहिले.

बुलढाणा अर्बनची १६ लाख ४३ सभासद संख्या आहे. केवळ पतपुरवठा न करता “सहकारातून लोकोद्धार”साधण्यावर भाईजींनी भर दिला. त्यांच्याच मार्गदर्शनात सर्वसामान्य सभासदांच्या विश्वासाच्या बळावर हा सेवारथ पुढे नेणार असल्याचे अभिवचन अध्यक्ष डॉक्टर सुकेश झंवर यांनी दिले. यावेळी उपाध्यक्ष म्हणून विनोद केडिया यांची देखील अविरोध निवड करण्यात आली .

Ravikant Tupkar : पिकविमा व नुकसान भरपाईचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

डॉ सुकेश झंवर यांचा जन्म यवतमाळ येथे झाला. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण यवतमाळ येथे झाले. त्यानंतर नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी एम.बी.बी.एस. केले. त्यानंतर प्रवरानगर येथे आर्थोपेडिक (एम.एस.) चे शिक्षण घेतले. पुढील पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी जर्मनी येथे गेले. त्याठिकाणी त्यांनी जाॅईंट रिप्लेसमेंट मध्ये प्राविण्य मिळवले. उच्चविद्या विभूषित असलेले डॉक्टर सुकेश झंवर यांनी सहकार क्षेत्रात हाडाचे अर्थतज्ञ म्हणून नावलौकिक मिळवला आहे.