Breaking

Sumit Wankhede : माओवाद्यांमुळेच लोकसभेत त्यांचे जास्त खासदार निवडून आले !

BJP MLA criticizes Maha Vikas Aghadi leaders over Public Safety Act : हे माओवादी उद्या त्यांच्याही गळ्याला नख लावल्याशिवाय राहणार नाहीत

Nagpur : माओवादी देशाच्या लोकशाहीला मानत नाहीत, संविधानाला मानत नाहीत. त्यांना सुरक्षा देण्याचे काम विरोधी पक्ष नेते करत आहेत. पण विरोधी पक्षाने असं न करता आपली लोकशाही आपलं संविधान याचा विचार करून एकमताने जनसुरक्षा कायद्याचा पुरस्कार केला पाहिजे. या विषयात सरकारला साथ दिली पाहिजे, असे मत भाजपचे आमदार सुमीत वानखेडे यांनी व्यक्त केले.

माओवादी लोकांच्या मदतीनेच लोकसभेत विरोधी पक्षाचे जास्त खासदार निवडून आले, असा गंभीर आरोप आमदार वानखेडे यांनी केला आहे. त्यांना देशद्रोही संघटनांनी मदत केली आहे. हेच लोक त्यांच्या लोकसभा निवडणुकीत आणि भारत जोडो यात्रमध्ये सामील झाले होते. आता यांच्या मुळावर घाव घातला जात असल्यामुळे विरोधी पक्षातील लोक त्यांच्या मदतीला सरसावले आहेत. राजकारण होत राहते. राजकीय पक्ष सत्तेत येत असतात, जात असतात. उद्या त्यांचा पक्ष सत्तेत आला तर हेच माओवादी त्यांच्या गळ्याला नख लावल्याशिवाय राहणार नाहीत, असे आमदार वानखडे म्हणाले.

Parinay fuke : ‘त्यांना’ राजकीय कावीळ झालाय !

महात्मा गांधी यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे, असे ते सांगतात. पण त्यांच्यामध्ये माओवादी विचारांनी घुसखोरी केली आहे. एकीकडे गांधींच्या विचारांवर विरोधी पक्ष चालतो आणि दुसरीकडे त्याच्या विरोधात असलेल्या विचारांच्या लोकांना हे लोक मदत करतात. हा चक्क दुटप्पीपणा आहे, असेही सुमीत वानखेडे म्हणाले. हा कायदा तयार करण्यासाठी संयुक्त समिती स्थापन करण्यात आली होती. काँग्रेसचे नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) जयंत पाटील. जितेंद्र आव्हाड आदी प्रमुख नेते त्या समितीमध्ये होते. एकमताने या समितीचा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आला होता. कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी डिसेंट नोट दिली नाही. तरीसुद्धा कायदा पारित झाल्यावर हा कायदा चुकीचा आहे, लोकशाहीच्या विरोधात आहे, असा अपप्रचार विरोधी पक्षांकडून करण्यात येत असल्याचेही आमदार वानखेडे म्हणाले.