Sunetra pawar : 20 पेक्षा जास्त आमदारांची सुनेत्रा पवारांशी तातडीची बैठक

ncp-20-mlas-meet-sunetra-pawar-demand-cbi-probe-ajit-pawar-accident : अजित पवार अपघातप्रकरणी CBI चौकशीची मागणी, सीएमची भेट लवकरच?

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी हालचाल सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांची पक्षातील 20 हून अधिक आमदारांनी मुंबईतील देवगिरी निवासस्थानी उशीरा रात्री भेट घेतली. या बैठकीत दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत डीजीसीएच्या अहवालावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून सीबीआय चौकशीची मागणी जोर धरत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर महिन्याभराने डीजीसीएचा अहवाल समोर आला होता. मात्र अहवालातील त्रुटी आणि विसंगतींचा दाखला देत आमदारांनी स्वतंत्र आणि सखोल चौकशीची मागणी केली. सीबीआय चौकशीचा निर्णय अद्याप का घेतला गेला नाही, असा थेट सवालही या बैठकीत उपस्थित करण्यात आल्याचे समजते.

Rajya sabha election : राज्यसभा रणधुमाळीत शरद पवारांना रोखण्यासाठी एकनाथ शिंदेंचा डबल डाव?

या प्रकरणी सर्वसामान्यांच्या मनातही शंका निर्माण झाल्या असल्याचे सांगत आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकत्रित भेट घेण्याची विनंती सुनेत्रा पवार यांच्याकडे केली. त्यावर सर्वांनी मिळून मुख्यमंत्र्यांना भेटू, असे आश्वासन सुनेत्रा पवार यांनी दिल्याची माहिती आहे. अपघातानंतर घटनास्थळावरून मिळालेल्या काही वस्तूही आमदारांना दाखवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे या प्रकरणावर सातत्याने आवाज उठवत आहेत. अपघातामागे घातपाताचा संशय व्यक्त करत त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत चर्चा केली असून लवकरच राहुल गांधी यांचीही भेट घेणार असल्याची माहिती आहे.

मात्र अजित पवार यांच्या पक्षातील वरिष्ठ नेते या मुद्द्यावर फारसे आक्रमक दिसत नसल्याने काही आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. अमोल मिटकरी यांचा अपवाद वगळता पक्षातील अनेक नेते सार्वजनिक भूमिका घेताना दिसत नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच 20 हून अधिक आमदारांनी एकत्र येत सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन स्पष्ट भूमिका मांडल्याचे समोर आले आहे.

Farmer loan waiver : मोठी घोषणा लवकरच? ३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीवर निर्णय

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत दबाव वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. सीबीआय चौकशीचा निर्णय होतो का, आणि मुख्यमंत्री यांच्याशी होणाऱ्या बैठकीत काय निष्पन्न होते, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.