Behind scenes story behind Sunetra Pawar swearing in as Deputy Chief Minister : सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीमागची पडद्यामागील कहानी
Mumbai : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभावी नेते अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड वेगाने घडामोडी घडत आहेत. आज सायंकाळी पाच वाजता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. या शपथविधीपूर्वी दुपारी दोन वाजता विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून, त्यात सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली जाणार आहे. मात्र, हा निर्णय इतक्या कमी वेळात कसा झाला, यामागची पडद्यामागील घडामोड आता समोर येत आहेत.
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रे पुन्हा हातात घेण्याचा प्रयत्न पवार कुटुंबात सुरू झाला होता. अजित पवार यांनी पक्षात बंड केले त्या काळात ते पूर्णपणे एकटे पडले होते. अजित पवार एका बाजूला आणि संपूर्ण कुटुंब दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पवार कुटुंबातील एकही व्यक्ती त्या वेळी त्यांच्या सोबत उभी नव्हती. तरीही अजित पवार यांनी पक्ष उभा केला आणि तो टिकवण्यासाठी मोठा संघर्ष केला.
Akola municipal corporation :‘घोडेबाजार’ करून भाजपने सत्ता स्थापन केली;
अजित पवार यांच्या निधनानंतर तो पक्ष सुरक्षित राहावा, त्यांचे राजकीय स्वप्न अपूर्ण राहू नये, ही जबाबदारी पत्नी म्हणून सुनेत्रा पवार यांनी स्वतःवर घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सुरुवातीला सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी तयार नव्हत्या. दुःखातून सावरण्याची त्यांची मानसिक स्थिती नव्हती. मात्र, जर त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली नाही, तर अजित पवार यांनी उभा केलेला पक्ष हातातून जाईल आणि त्यांच्या आयुष्यभराच्या राजकीय स्वप्नावर पाणी फिरेल, याची जाणीव त्यांना करून देण्यात आली.
याच जाणिवेतून आणि पतीचे कार्य टिकवणे हे आपले कर्तव्य मानून सुनेत्रा पवार यांनी जड अंतःकरणाने उपमुख्यमंत्रीपदासाठी होकार दिला, अशी इनसाईड माहिती समोर आली आहे. त्यामुळेच आधी पक्ष सांभाळणे आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा पुढे नेणे, असा निर्णय कुटुंबीयांनी घेतल्याचे समजते. याच कारणामुळे विलिनीकरणाच्या चर्चांपूर्वी आधी शपथविधी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडे कोणती खाती राहणार, याबाबतही चर्चा सुरू आहे. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासोबत अर्थ खाते आणि इतर महत्त्वाची खाती होती. मात्र, सध्याच्या घडीला अर्थ खाते वगळता इतर खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे कायम राहणार असल्याची माहिती आहे. राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा विभागाची जबाबदारी त्यांच्याकडेच राहणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अर्थ खातेही सुनेत्रा पवार यांच्याकडे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज केवळ सुनेत्रा पवार यांचाच शपथविधी होणार असून, मंत्रिमंडळात अन्य कोणत्याही नव्या चेहऱ्याचा समावेश होणार नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या काही दिवसांत घडलेल्या या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य, विलिनीकरणाची दिशा आणि राज्यातील सत्तासमीकरणे याबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
___








