Sunil Kedar : पोरानों, किती दिवस डुबक्या मारत राहणार!

Boys, how long will you keep diving : नाही तर ५ किलो राशन व दीड हजार रुपयांच्या बिदागीवर आयुष्य काढावे लागेल

Nagpur : केवळ नदीत डुबक्या मारून तुमच्या कर्तृत्वाला पंख फुटणार नाहीत. त्यासाठी आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न पाहिले पाहिजे, असे आवाहन माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार (Sunil Kedar) यांनी केले.

सावनेर तालुक्यात आयोजित केलेल्या एका शंकरपटाच्या कार्यक्रमात बोलताना सुनील केदार यांनी युवकांची चांगलीच कानउघडणी केली. आपण नास्तिक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, उद्धव ठाकरे (Udhdhav Thackeray) यांच्यासोबत आपण अयोध्येला गेलो होतो. परंतु आस्था एका ठिकाणी व देवभक्तीचे अवडंबर हे दुसऱ्या ठिकाणी. केवळ अवडंबरामध्ये अडकून आजचा युवक कर्तृत्वहीन झाला आहे.

Schools in rural areas : नवीन संचमान्यतेमुळे गरीब व ग्रामीण विद्यार्थ्यांवर अन्याय

महाप्रसादासमोर रांगा लावून आयुष्य घालवणार असाल तर तुमचे व तुमच्या येणाऱ्या पिढीचे कधीही भले होणार नाही.  आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले ते यासाठी नव्हते. स्वातंत्र्यापूर्वी देशात फार शाळा व महाविद्यालये नव्हती. परंतु तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी सामान्य लोकांना शिक्षण मिळावे, यासाठी शाळा व महाविद्यालये, आयआयटीसारख्या संस्था निर्माण केल्या. यातून एक नवी पिढी घडली. या शिक्षणामुळे देशाचे नाव आज जगात झाले आहे.

आज आपली पिढी कुठे जात आहे, असा सवाल करून केदार म्हणाले, आजचा युवक व्हाट्सअपमध्ये मश्गुल आहे. त्याला आपल्या कर्तृत्वाची जाणीव राहिली नाही. देव जर सगळे करीत असतील तर मग शेतात काम करण्याची गरज नाही. शेतातील दगडाला सेंदूर फासून पीक उभे राहणार आहे काय? खेंड्यांतील युवकांनी किती दिवसत नांगर धरून दुसर्यांची चाकरी करायची आहे?

Mahavitaran’s electricity rates : ३ मार्चला महावितरणच्या वीजदर निश्चितीकरणावर जाहीर ई-सुनावणी

या गावातील युवकांनी विमानातून फिरण्याचे स्वप्न पाहायचे नाही काय, हे स्वप्न पाहायचे असेल तर देवभक्तीतून काहीसे दूर होऊन स्वकर्तृत्वावर विश्वास ठेऊन काम केले पाहिजे. तरच आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न साकार होईल, नाही तर ५ किलो राशन व दीड हजार रुपयांच्या बिदागीवर आयुष्य काढावे लागेल, असा इशारा सुनील केदार यांनी दिला.