It started during the tenure of Bhandara Gondia’s former MP Sunil Mendhe : माजी खासदार सुनील मेंढे यांच्या कार्यकाळात झाली होती सुरुवात
Gondia : गोंदिया रेल्वे स्थानकावर सततची खोळंबणारी रेल्वे वाहतूक, परिणामी गाड्यांना होणारा विलंब आणि प्रवाशांना होणारा मनस्ताप, यामधून आता प्रवाशांची सुटका होणार आहे. माजी खासदार सुनील मेंढे यांनी वारंवार पाठपुरावा करून व विशेष लक्ष देऊन केलेला रेल ओव्हर रेल उड्डाणपूल आता पूर्णत्वास जात आहे. पुढील महिनाभरात यावरून वाहतूक सुरु होऊन प्रवाशांना होणारा त्रास दूर होणार आहे.
गोंदिया रेल्वे स्थानक जंक्शन असल्याने तेथे मुंबई – हावडा आणि चंद्रपूर – जबलपूर अशा दोन्ही दिशांना जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची सतत रेलचेल असते. मात्र रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर येताना वारंवार ट्रॅक बदलावे लागत असल्याने अनेकदा चंद्रपूर – जबलपूरकडे जाणाऱ्या गाड्या रेल्वे स्थानकावर विलंबाने येत होत्या. यामुळे वेळेत न धावणाऱ्या गाड्यांचा त्रास प्रवाशांना होत होता.
Congress March : नागपुरात उद्या काँग्रेसचा सद्भावना शांती मार्च !
प्रचंड त्रस्त झालेल्या प्रवाशांकडून वारंवार यावर उपाययोजना करण्याची मागणी केली जात होती. वर्ष २०२० मध्ये तत्कालीन खासदार सुनील मेंढे यांच्या कार्यकाळात या कामास सुरुवात झाली होती. सदर कामामध्ये २६ पुल असून त्यामध्ये दोन मोठ्या पुलांचा समावेश आहे. गोंदिया-ढाकणी-डव्वा असाआरओआर असून तो १३.५ किमी लांबीचा आहे. सदर कामाची किंमत २०० कोटी इतकी आहे.
Harshawardhan Sapkal : भाजपने मुस्लीम व्यक्तीला पंतप्रधान करावे
गोंदिया रेल्वे स्थानकात तयार होत असलेले दोन उड्डाणपूल जवळपास पूर्ण झाले आहेत. पुढील महिन्यात हे पूल तयार होऊन यावरून रेल्वेची वाहतूक होऊ शकेल. यामुळे ट्रॅक बदलून मार्ग देण्याचा प्रकार थांबणार आहे. कोणत्याही मार्गावरील गाड्यांना अन्य गाड्यांसाठी थांबविले जाणार नाही. त्यामुळे या गाड्या वेळेत धावणार आहेत. परिणामी प्रवाशांना होणारा विलंबाचा त्रास आता कमी होणार आहे. माजी खासदार सुनील मेंढे यांच्या प्रयत्नातून पूर्णत्वास येत असलेल्या या कामामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.