Breaking

Sunil Mendhe : अमृत स्टेशन योजना स्थानकांचे रूप पालटणार

The review by Chief Minister Devendra Fadnavis and Railway Minister Ashwini Vaishnav will speed up the work : मुख्यमंत्री व रेल्वे मंत्र्यांच्या आढाव्यामुळे कामाला गती मिळेल

Bhandara : रेल्वे प्रवाशांना सुविधा मिळाव्या आणि रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण व्हावे. या दृष्टीने भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील भंडारा, तुमसर रोड व गोंदिया या रेल्वे स्थानकांचा केंद्र शासनाच्या “अमृत स्टेशन” योजनेअंतर्गत समावेश करण्यात आला. कामाचे भूमिपूजन सुनील मेंढे खासदार असताना करण्यात आले होते. आता दोन्ही जिल्ह्यांतील रेल्वे स्थानकांचे रुपडे पालटणार आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अनुषंगाने आढावा घेतला. कामाची प्रगती त्यांनी जाणून घेतल्याने लवकरच नव्या रूपात स्टेशन प्रवाशांच्या सेवेत येईल, असा विश्वास माजी खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केला आहे. मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणविस व केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रातील रेल्वेच्या संदर्भात विविध कामांचा आढावा घेत काही नवीन घोषणा केल्या.

Sudhir Mungantiwar : पांढरकवड्याचा धार्मिक आणि सांस्कृतिक विकास अधिक वेगाने होईल !

विशेष म्हणजे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील अमृत स्टेशन योजनेअंतर्गत समावेश असलेल्या भंडारा, तुमसर रोड आणि गोंदिया रेल्वे स्थानकांचा उल्लेख यावेळी करण्यात आला. ही तिन्ही रेल्वे स्थानके यापूर्वीच केंद्र शासनाने “अमृत स्टेशन” योजनेअंतर्गत समाविष्ट करून त्याच्या विकासाच्या आणि सौंदर्यात भर घालण्याच्या दृष्टीने काम सुरू केले आहे.

खासदार असताना या कामाचे भूमिपूजन आपण केले. या स्थानकांचा अमृत स्टेशन योजनेअंतर्गत समावेश व्हावा म्हणून आपण त्यावेळी रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. प्रवाशांना अत्याधुनिक सोयी आणि रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करून नव्या व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या या कामाचा रेल्वेमंत्र्यांनी आढावा घेतला असल्याचे सुनील मेंढे यांनी सांगितले.

Chandrashekhar Bawankule : उमरेड एमआयडीसीतील अपघात: मृत व्यक्तींच्या कुटुंबास ६० लाखांची मदत

या आढाव्यामुळे सुरू असलेल्या विकास कामाची गती वाढवून लवकरच प्रवाशांना अमृत स्टेशन योजनेअंतर्गत नावारूपास आलेले रेल्वे स्थानक सेवेत आलेले दिसेल, असा विश्वासही माजी खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केला आहे. तसेच याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सुनील मेंढे यांनी आभार व्यक्त केले.