Breaking

Supriya Sule On Ajit Pawar : दादासोबत जाण्यास ताई तयार! सुप्रिया सुळेंचे संकेत

NCPs merger discussed on Anniversary celebrations : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा वर्धापन सोहळा, विलीनीकरण्याची पुन्हा चर्चा

Pune : राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार गटाचा वर्धापनदिन सोहळा पुण्यात होत आहे. तत्पूर्वी, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या सूचक विधानामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुण्यात 26 वा वर्धापन दिन सोहळा साजरा करत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पक्षाचा वर्धापन दिन सोहळा बालगंधर्व रंगमंदिर येथे ध्वजारोहणाने सुरु झाला. मात्र तत्पूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान समोर आले आहे.

Ajit Pawar NCP : खामगावात सानंदा, अकोल्यात कोण?

आमच्या गटातील काही जणांना सत्तेत जावं वाटतं, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. यातच या मेळाव्याआधी सुप्रिया सुळेंनी ‘सहन करायला शिका’, असं स्टेटस ठेवलं होतं. यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं. माझ्या आईने मला सल्ला दिला तो मी माझ्या स्टेट्सला ठेवला, ती माझी खासगी बाब आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

शरद पवारांनी मला राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. तसेच अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने देखील पुण्यातच वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन केलं असून दुपारी बालेवाडी ग्राऊंड येथे हा सोहळा पार पडेल.

NCP Politics : आमदार मिटकरी म्हणाले, आता पांडुरंगाची ईच्छा..!

सोहळ्यासाठी पक्षाचे सर्व मंत्री आमदार खासदार, माजी खासदार उपस्थित असणार आहेत. मागील काही दिवसांपासून सातत्याने दोन्ही राष्ट्रवादी एक होणार अशा चर्चा सुरू आहेत. त्यामुळे या अनुषंगाने काही महत्त्वाची घडामोड घडते का? या बद्दल कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.

Neelesh Rane vs NItesh Rane: नीलेश राणेंचा बंधू नितेशला ‘सबुरीचा’ सल्ला

शरद पवार यांनी 2014 मध्ये तर… राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा असेल असे जाहिर करून टाकले होते. तसेच विश्वासदर्शक ठरावावर भाजपला मतदान केल्याचं तटकरे, पटेलां यांनी ही स्पष्ट केले होते ‘सत्तेत जाऊ’ असा निर्णय कोअर कमिटीने घेतला होता. नंतरही राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार अशी पुन्हा चर्चा सुरू झाली दरम्यान शरद पवार आणि अमित शाह यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे सांगितले जात होते. जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि अजित पवारांचा गट भाजप सरकारमध्ये सहभागी झाला नंतर, अजित पवार-शरद पवारांमध्ये वारंवार भेटी होत असून राष्ट्रवादी एक होणार अशा चर्चा कायम सुरू आहेत