said, the Chief Minister will have the real information in this case. : म्हणाल्या, या प्रकरणात वास्तविक माहिती मुख्यमंत्र्यांना असेल
Pune : पुण्यातील नवले ब्रिजवर झालेल्या भीषण अपघातानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज घटनास्थळी पाहणी केली. पुण्यात महत्त्वाची भेट असल्याचे सांगत त्या सकाळीच नवले पुलाच्या दिशेने रवाना झाल्या. आठवड्याला नियमितपणे विविध भागांना भेट देत असून आजची भेटही त्याच मालिकेतील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आणि रस्ते सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची विनंतीही केली. गडकरी यांनी रस्त्यांवरील ब्लॅक स्पॉट्सचे निवारण करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करताना त्या म्हणाल्या की, फक्त बोर्ड लावून उपयोग होत नाही, सीट बेल्ट आणि हेल्मेटसाठी कडक धोरण आणणे अत्यावश्यक आहे. दोन दिवसांपूर्वीचा अपघात अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत त्यांनी सेफ्टी आणि चेकिंग यंत्रणा अधिक मजबूत करण्याची गरज व्यक्त केली. पुढे बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा रोड सेफ्टी कार्यक्रम राबवण्याची विनंती केली आणि त्यासाठी आम्ही पूर्ण साथ देऊ असे सांगितले.
या भेटीदरम्यान पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणाबद्दल प्रश्न उपस्थित होताच सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच बोट दाखवले. ही लोकशाही आहे आणि प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, परंतु या प्रकरणात वास्तविक माहिती मुख्यमंत्र्यांकडेच आहे, त्यांना विचारा, असे त्यांनी स्पष्ट केले. अंजली दमानिया यांनी पार्थ पवार प्रकरणात केलेल्या गंभीर आरोपांबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, दमानिया अनेक विषय उचलतात. ईडी ही संस्था चांगली आहे परंतु तिच्यावर कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. संस्थांवर अदृश्य शक्तींचा प्रभाव दिसतो आणि त्यामुळे अनेक गोष्टी घडताना दिसतात, असे त्यांनी म्हटले.
Youth on streets : तरुणाई रस्त्यावर, मेक्सिकोमध्ये Gen-Z चा संताप उसळला;
काँग्रेसविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांच्या अंतर्गत चर्चा झाल्या असल्या तरी आमच्यात तशी चर्चा झालेली नाही. पूर्वीही ते एकत्र असूनही स्वतंत्रपणे लढले होते, त्यामुळे महाराष्ट्रात वेगळे काही घडत नाही. पुढे महिला पत्रकारांबाबत बोलताना त्यांनी सुचवले की, सर्व महिला पत्रकारांनी एकत्र येऊन विशाखा समिती संदर्भातील प्रत्यक्ष परिस्थितीवर एक अहवाल तयार करावा आणि तो सरकारला सादर करावा. आजचे सरकार सतत 70 साल में काँग्रेसने क्या किया म्हणत विचारते, पण माझ्या काळात मी सुरक्षितपणे शिक्षण घेऊ शकले, शाळेत जाऊ शकले. आता मात्र परिस्थिती बदलली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. नाशिक, जुन्नरमध्ये बिबट्याचे दर्शन नियमित होत आहे, हे आपण कधी ऐकले होते का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी पर्यावरणीय आणि सामाजिक बदलांवरही भाष्य केले.








