Breaking

Suresh Dhas : ‘कृषी’ विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार

suspension action against senior officials in the ‘Agriculture’ department possible : शासनाने कारवाईचे प्रस्ताव मागवले; जेडीए प्रमोद लहाळे व एसएओ शंकर तोटावार अडचणीत

Amravati कृषी विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक (JDA) प्रमोद लहाळे आणि चंद्रपूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (SAO) शंकर तोटावार यांच्याविरोधात सातत्याने तक्रारी करणाऱ्या आमदार सुरेश धस यांच्या पाठपुराव्यानंतर शासनाने या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईचे प्रस्ताव मागवले आहेत.

विशेष म्हणजे, कृषी आयुक्त कार्यालयाला याबाबतचे पत्र ३ जुलै रोजी प्राप्त झाले असले तरी ते ८ जुलैपर्यंत रोखून ठेवण्यात आले होते. अखेर आमदार धस यांनी कृषी मंत्री आणि प्रधान सचिवांकडे तक्रार केल्यानंतरच हे पत्र अधिकृतपणे आयुक्तांना सुपूर्त करण्यात आले.

Local Body Elections : निवडणूक आयोगाची जिल्हाधिकाऱ्यांसोबत Video Conference, राज्यस्तरीय आढावा बैठक १० जुलैला

या दोन्ही अधिकाऱ्यांवर अनियमितता व भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असून, त्यांच्याविरुद्ध चौकशी सुरू असताना ते पदावर राहिल्यास तपासावर परिणाम होईल, असे आमदार धस यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने निलंबित करून, वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी कृषी सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्याकडे केली.

कृषी आयुक्त पुणे यांना दिलेल्या पत्रात, या प्रकरणाची तातडीने शहानिशा करून योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आवश्यकतेनुसार परिपूर्ण प्रस्ताव शासनाला त्वरीत सादर करण्याचे निर्देश या पत्रात नमूद आहेत.

Vidarbha Farmers : बोगस सोयाबीन बियाणांमुळे दुबार पेरणीची वेळ

आमदार धस यांनी या अधिकाऱ्यांवर गंभीर आर्थिक व प्रशासकीय अनियमिततेचे आरोप करत दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. यासोबतच, या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनाही सहआरोपी करण्याचा आग्रह त्यांनी धरला आहे.