Suspense on Guardian Minister : प्रफुल्ल पटेल ठरवतील गोंदियाचा पालकमंत्री!

 

Praful Patel will decide the Guardian Minister of Gondia : बाहेरच्याच नेत्याला मिळणार पद; पण नावाचा सस्पेन्स कायम

गोंदिया जिल्ह्यात राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर दीड महिना लोटला आहे. तर नवीन मंत्रिमंडळ गठीत होऊन महिना उलटला आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप झाले आहे. पण तरीही जिल्ह्याचे पालकमंत्री अद्याप जाहीर करण्यात आले नाहीत. गोंदिया जिल्ह्याला बाहेरील पालकमंत्री मिळणार हे निश्चित आहेत. पण पालकमंत्र्यांच्या नावाचा सस्पेन्स देखील कायम आहे. यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल हेच पालकमंत्र्याचे नाव ठरवतील, असेही बोलले जात आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळात गोंदिया जिल्ह्याची पाटी कोरी आहे. जिल्ह्यातील चारही आमदार महायुतीचेच निवडून आले आहेत. परंतु त्यापैकी कुणाचीही मंत्रिमंडळात वर्णी लागली नाही. विजय रहांगडाले, विनोद अग्रवाल, संजय पुराम हे भाजपचे तर राजकुमार बडोले हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत. यामुळे गोंदिया जिल्ह्याला बाहेरील पालकमंत्री मिळण्याची परंपरा कायम आहे.

Sports authority of India : संचालक अचानक धडकले अन् तारांबळ उडाली!

गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मंत्र्यांकडे राहणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे. पण अशात भाजपच्या मंत्र्यांकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद गेल्यास आश्चर्य वाटू नये.

जिल्हा नियोजन समितीचे काम
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, ज्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका मानल्या जातात. पालकमंत्रिपद राहिले तर नेत्यांना जिल्ह्यात थांबून पक्ष संघटनेचीही जबाबदारी पार पाडता येऊ शकते. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मोठा निधी देऊन अनेक विकासाची कामे मार्गी लागतात. त्यामुळे हे पद ज्या पक्षाकडे राहील, त्या पक्षाला फायदा होऊ शकतो.

Tiger death : कोहका-भानापूरमध्ये वाघाचा मृत्यू

प्रजासत्ताक दिनापूर्वी घोषणा
प्रजासत्ताक दिनापूर्वी महाराष्ट्रातील जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठका पार पडल्या आहेत. या बैठकीत पालकमंत्र्यांच्या यादीवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.