Breaking

Swami Anand Swaroop : ठाकरे बंधू, मी मुंबईत येतोय, औकात असेल तर हात लावून दाखवा;

Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally : हात तोडला नाही तर बघा, स्वामी आनंद स्वरुप यांचं आव्हान

Mumbai : ‘मी मुंबईत येतोय, औकात असेल तर हात लावून दाखवा’ असे आव्हान स्वामी आनंद स्वरुप यांनी समाज माध्यमावर एक व्हिडीओ पोस्ट करत दिले आहे. त्यांनी म्हणाले आहे की, मी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनाही खुले आव्हान देत आहे. मी लवकरच मुंबईत येईन आणि तिथे उभा राहून हिंदीत बोलेन, बघूया कोण मला थांबवते. तसेच, औकात असेल तर हात लावून दाखवा, हात तोडून नाही टाकले तर बघा, असं विधान काली सेनेचे अध्यक्ष स्वामी आनंद स्वरुप यांनी केलं आहे. त्यामुळे स्वामी आनंद स्वरुप यांच्या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादाने आता मराठी विरुद्ध अमराठी असं रूप घेतलं आहे. त्यातच मराठीत न बोलल्याने मीरारोड येथे एका दुकानदाराला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवर आता एक प्रसिद्ध व्यावसायिक आणि केडियोनॉमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी मराठीप्रेमींना डिवचणारं विधान केलं. मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा, असे केडिया यांनी एका पोस्टमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांना टॅग करत म्हटलं आहे. त्यानंतर आता काली सेनेचे अध्यक्ष स्वामी आनंद स्वरुप यांनी ठाकरे बंधूंवर वादग्रस्त टीका केली आहे.

transporters strike : मालवाहतूकदारांचा संप तूर्त स्थगित पण टांगती तलवार कायम!

आज ठाकरेंच्या विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी जे बाराखडी शिकणार नाहीत, त्यांचे बारा वाजणार असा इशारा माध्यमाशी बोलताना दिला. महाराष्ट्रात मराठी शिकावीच लागेल. हिंदी भैय्यांनी आम्हाला शिकवू नये, असेही त्यांनी सांगितले. मराठीचा अपमान करणाऱ्यांनी एक तर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी किंवा आम्ही कारवाई करू, असाही इशारा त्यांनी दिला. आज वरळी डोममध्ये संपूर्ण मराठीमय वातावरण तयार झाले आहे. नेमका कोणता संदेश ठाकरे बंधू या मोर्चातून देणार? याकडे राज्यासह महाराष्ट्राचे लक्ष आहे. दुसरीकडे, सामनामधून ठाकरे बंधूंच्या मिलनावर भावनिक साद घालण्यात आली असून गुजराती जयजयकार करणाऱ्या शिंदेंचा समाचार घेण्यात आला आहे.