Ration for 2,66,633 people will be stopped : E-KYC झालेलेच नाही; १५ मार्चनंतर होणार कार्यवाही
Wardha सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना धान्य वितरित केले जाते. त्यासाठी आता ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. अद्याप तब्बल २ लाख ६६ हजार ६३३ लाभार्थ्यांनी ई-केवायसी E-KYC केलेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी ई-केवायसी केली नाही तर त्यांचे रेशन बंद होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील एकूण ११ लाख ३९ हजार ९०० लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांपैकी ६ लाख १६ हजार ३७९ लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. तर २७ हजार ४१४ लाभार्थ्यांना रिजेक्ट करण्यात आले आहे. सध्या २ लाख २९ हजार ४७४ लाभार्थ्यांची ई-केवायसी पेंडिंग आहे, तर २ लाख ६६ हजार ६३३ लाभार्थ्यांनी अद्यापही ई-केवायसी प्रक्रियाच केलेली नाही.
A threat to repeat the Beed incident : तुझा ‘मस्साजोगचा सरपंच’ करेन; धमकी देऊन मारहाण
वर्धा जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील ज्या लाभार्थ्यांची केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांनी १५ मार्चपर्यंत आपले स्वस्त धान्य दुकान किंवा मेरा ई-केवायसी ॲपव्दारे ई-केवायसी पूर्ण करावी. काही अडचण असल्यास स्वस्त धान्य दुकान किंवा तालुका पुरवठा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
Fair price shop : मोफत रेशन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई!
रेशन कार्डवरील सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. शासनाच्या निर्देशानुसार सर्वांनी ई-केवायसी तातडीने करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ७६.६१ टक्के लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली असून, २३.३९ लाभार्थ्यांनी अद्यापही ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्यावी, असे सांगण्यात आले आहे