Belora Airport becomes wildlife-free : बेलोरा विमानतळ झाले वन्यप्राणी मुक्त
Amravati : तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर अमरावतीच्या बेलोरा विमानतळाला ‘वन्यप्राणी मुक्त’ घोषित करण्यात आले आहे. वन विभागाने महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाला याबाबतचे प्रमाणपत्र 17 जानेवारी रोजी दिले आहे. यामुळे केंद्र सरकारकडून प्रवासी वाहतूक ‘ऑपरेटिंग लायसन्स’ मिळवण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
15 जानेवारी रोजी वन विभाग आणि महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळ परिसरात सखोल पाहणी केली. तीन महिन्यांत 300 हून अधिक वन्यप्राणी बाहेर काढण्यात आले. वन्यप्राण्यांचा पूर्णतः बंदोबस्त झाल्यानंतर वन विभागाने विमानतळाला ‘वन्यप्राणी मुक्त’ असल्याचा अहवाल दिला.
Devendra Fadanvis : घरगुती विजेचा खर्च कमी होणार; महावितरणचा सौर ऊर्जा प्रकल्पाचा फायदा !
मुंबई प्रवासी विमानसेवेची तयारी
बेलोरा विमानतळावरून अमरावती ते मुंबई दरम्यान प्रवासी विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. अंतिम परवानगी मिळाल्यानंतर प्रवास सुरू होईल. यासाठी पुरवण्यात येणाऱ्या सुविधांची तयारी सुरू करण्यात आली आहे.
मार्चमध्ये लायसन्स अपेक्षित
महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली बेलोरा विमानतळावरील विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत. मार्च 2025 पर्यंत केंद्र सरकारकडून ‘ऑपरेटिंग लायसन्स’ मिळण्याची शक्यता आहे. एकदा लायसन्स मंजूर झाल्यानंतर पुढील प्रक्रिया अधिक वेगाने होणार आहे.
Bachchu Kadu : हम चलते तो चिते की रफ्तार से, रोकने की तुम्हारी औकात नहीं !
मुख्यमंत्री कार्यालयाचा पाठपुरावा
मुख्यमंत्री कार्यालयातून या प्रकल्पाविषयी नियमितपणे माहिती घेतली जात आहे. विमानतळ विकासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे प्रशासनाने तयारी वेगाने सुरू केली आहे. बेलोरा विमानतळ आता पूर्णतः वन्यप्राणी मुक्त झाले आहे. विमान प्रवासी सेवेसाठी कोणतीही अडथळा नाही, असे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी सांगितले.
विकसित विमानतळ सुविधांची तयारी
परिसर : 588 हेक्टर
धावपट्टी : 1,850 मीटर लांबी
सुविधा : पथदिवे, एटीसी टॉवर, प्रकाश व्यवस्था, टर्मिनल बिल्डिंग आणि आकर्षक दर्शनी भाग.