Breaking

Teacher recruitment scams : १२ वर्षांतील शिक्षकांच्या नियुक्त्यांची होणार तपासणी !

Appointments of teachers in the past 12 years will be inspected : तपासासाठी एसआयटीला दिला तीन महिन्यांचा कालावधी

Nagpur : नागपुरात उघडकीस आलेल्या शिक्षक भरती घोटाळ्याने राज्यभर खळबळ उडूवून दिली होती. या घोटाळ्यात अनेक उच्चपद्स्थ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. काहींना अटकपूर्व जामीन मिळवण्यात यशही आले. पण सरकारने हा घोटाळा अतिशय गांभीर्याने घेतला आणि कारवाई सुरू केली. त्यानंतर घोटाळेबाजांचे धाबे दणाणले. आता सरकारने सन २०१२ पासून नियुक्त झालेल्या शिक्षकांची तपासणी करण्यासाठी एसआयटी गठीत केली आहे.

नागपूर सायबर पोलिसांच्या तपासात ५४० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडीवर संबंधित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी नोकरीवर नसतानाही पगार उचलत असल्याचे वास्तव समोर आले आहे. या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी नोटीस जारी करण्यात आली आहे. हा घोटाळा केवळ नागपूर विभागातच नव्हे तर राज्यभर झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे या महाघोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विशेष तपास पथकाची SIT स्थापना केली आहे.

Sudhir Mungantiwar : स्वातंत्र्य दिन सोहळ्यात लोकतंत्र सेनानींना सन्मानपूर्वक निमंत्रण द्यावे

या एसआयटीची व्याप्ती राज्यभर असणार आहे. वरिष्ठ आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचा या समितीमध्ये समावेश आहे. पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार हे या एसआयटीचे प्रमुख असणार आहेत. तसेच पोलिस महानिरीक्षक मनोज कुमार शर्मा आणि शिक्षण आयुक्तालयाचे सहसंचालक हारूण आतार यांची समितीमध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Thrill of kidnapping :राजकीय वैमनस्यातून अपहरणाची थरारक घटना !

राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांच्या अधीन असलेल्या अनुदानित आणि अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची तपासणी एसआयटी करणार आहे. या एसआयटीला तपासासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. सन २०१२ पासून आजपर्यंत झालेल्या सर्व नियुक्त्यांची तपासणी हे पथक करणार आहे.