Breaking

Board Exams : ७०१ केंद्रांवरील शिक्षक आणि कर्मचारी बदलले !

Teachers and staff at 701 centers changed for 10th exam : दहावी परीक्षेचा अकोला पॅटर्न राज्यभर राबविणार

Akola अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी बारावी परीक्षेत राबविलेल्या ‘अकोला पॅटर्न’ Akola Pattern ची राज्यभर चर्चा झाली होती. या पॅटर्नअंतर्गत परीक्षा केंद्रांवरील कर्मचारी, शिक्षक आणि पर्यवेक्षकांची अदलाबदल करण्यात आली होती. परिणामी, कॉपीबहाद्दर आणि बोगस संस्था चालकांना चाप बसला. आता हाच पॅटर्न दहावीच्या परीक्षेत संपूर्ण राज्यभर लागू करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील ७०१ परीक्षा केंद्रांवरील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा दहावी परीक्षेत गैरप्रकार होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Akola Municipal Corporation : भांडवली मूल्याधारित मालमत्ता कराची अंमलबजावणी!

राज्यातील ५१३० केंद्रांपैकी ७०१ परीक्षा केंद्रांवरील संपूर्ण स्टाफ बदलण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. परीक्षेतील पारदर्शकता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

दहावीच्या परीक्षेला शुक्रवार, दि. २१ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. १७ मार्चपर्यंत लेखी परीक्षा असेल. १ लाख ८० हजार मनुष्यबळ परीक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रांवर भरारी पथक व बैठकी पथक नियुक्त करण्यात आले आहे. दहावी परीक्षेसाठी राज्यभर कठोर पावले उचलण्यात आली असून, “अकोला पॅटर्न” लागू केल्यामुळे परीक्षेतील गैरप्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Gajanan Maharaj Prkatdin : महाप्रसादाने कट्टर विरोधकांना आणले एकत्र!

महत्त्वाच्या सूचना..
विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता केंद्रसंचालक किंवा पर्यवेक्षकांना त्वरित माहिती द्यावी. केंद्रावर दुबार प्रवेशपत्र असल्याने पडताळणी करून परीक्षा देता येईल. मात्र, विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट मुद्दाम विसरू नये. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र, निळ्या किंवा काळ्या शाईचा पेन, पारदर्शक परीक्षा पॅड (ज्यावर काही लिहिलेले नसावे), पाणी बाटली आणि आवश्यक औषधे सोबत न्यावीत. मोबाईल, स्मार्ट वॉच, कॅलक्युलेटर किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू परीक्षा हॉलमध्ये नेण्यास सक्त मनाई आहे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

शाळांनी घ्यायची काळजी..
सर्व विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावरील विषय व माध्यम दुरुस्तीची खातरजमा करावी. परीक्षा केंद्र असलेल्या शाळांमध्ये स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, सीसीटीव्ही आणि जनरेटर यांची सोय करावी. परीक्षा केंद्र प्रमुखांनी शाळा सुसज्ज करून परीक्षेसाठी केंद्रसंचालकांच्या ताब्यात द्यावी, असे शाळांना कळविण्यात आले आहे.