Breaking

Teachers appopintment scam : शिक्षक भरती घोटाळ्याचे लोण अमरावतीत

High officials and ministers are involved in the scam? : उच्च पदाधिकारी आणि मंत्री यांचा संबंध?

Amravati राज्यात गाजत असलेल्या ‘बॅक डेट’ शिक्षक भरती घोटाळ्याचे लोण अमरावती जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचले असून, शिक्षण विभागात उच्च पातळीवर हालचाली सुरू झाल्याचे समजते. या प्रकरणात काही माजी व विद्यमान मंत्र्यांचाही अप्रत्यक्ष लाभ असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिक्षण विभागात कमालीची शांतता असूनही आंतरिक हालचालींना वेग आला आहे.

पुणे शिक्षण संचालनालय, उपसंचालक कार्यालय, मंत्रालयातील संबंधित अधिकारी यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे. अनेक ठिकाणी शिक्षक भरती बंद असतानाही ‘बॅक डेट’ पद्धतीने वेतन मंजूर करण्यात आले. काही भागांत एका महिन्यात १५० कर्मचाऱ्यांचे वेतन प्रचलनात आले, जे पूर्वी १००च्या आसपास होते. हे लक्षात न आल्याची जबाबदारी कोण घेतो, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

Akash Fundkar : महाराष्ट्राचा होतोय सर्वसमावेशक विकास!

‘पहिले छोकरी, मग नोकरी’ या वाक्याने अमरावती जिल्हा परिषदेमधील भरती प्रक्रिया बदनाम झाली आहे. पडद्यामागे कार्यरत असलेल्या तथाकथित ‘गोल्डन गँग’ने अनेक अपात्रांना नोकरी मिळवून दिल्याचे आरोप आहेत. या टोळीतील सदस्यांचे कुटुंबीय, नातेवाईक शिक्षण व आरोग्य विभागात नोकरीत आहेत.

दरम्यान, अल्पसंख्याक शाळांना मान्यता देताना मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही समोर येत आहे. शिक्षण विभागातील एक कार्यकर्त्या ‘दिनेश’ याच्यावर बोगस शिक्षक नेमणूक आणि शाळा खरेदीचे आरोप झाले असून, त्याच्या प्रकरणात चौकशी झाल्यास अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येऊ शकतात.

Maharashtra Day : जनतेने मेहनतीने महाराष्ट्राला अग्रस्थानी पोहोचवले !

सध्या कोणतीही अधिकृत चौकशी सुरू नसून, जबाबदार अधिकाऱ्यांवर वा मंत्र्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे या प्रकाराची दखल न्यायालय सुमोटो घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.