Teachers’ Constituency Election : शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेसची पूर्वतयारी

Congress Holds Preparatory Meeting in Amravati : प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष शेख यांनी अमरावतीत घेतला आढावा

Amravati शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू झाली आहे. या अनुषंगाने १ नोव्हेंबरपासून नव्या मतदार नोंदणीची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानेही आपली यंत्रणा सक्रिय केली असून, निवडणुकीपूर्व नियोजनासाठी आज (गुरुवारी) अमरावती येथे काँग्रेस भवनात पूर्वतयारी बैठक घेण्यात आली.

या बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण)चे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी भूषवले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शेख हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. बैठकीला खा. बळवंत वानखेडे, माजी मंत्री यशोमती ठाकर, माजी आमदार वीरेंद्र जगताप, सुनील देशमुख, बबलू शेखावत, मिलिंद चिमोटे, विलास इंगोले, अशोक अमानकर, प्रफुल्ल मानकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Pradhan Mantri Fasal Bima Yojana : पीक विम्यापोटी फक्त ५ रुपये; संतप्त शेतकऱ्यांनी रक्कम केली परत!

बैठकीत शिक्षक मतदारसंघातील संघटनात्मक तयारी, मतदार नोंदणी मोहिमेची आखणी, कार्यकर्त्यांची जबाबदारी आणि निवडणूक रणनीती या मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि शिक्षक मतदारांपर्यंत पोहोच वाढवण्यासाठी ठोस निर्णय घेण्यात आले.

Election commission of Maharashtra : स्थानिक निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट शक्यच नाही

या बैठकीला हरिभाऊ मोहोड, सुधाकर भारसाकळे, दयाराम काळे, प्रकाश काळबांडे, बाळासाहेब हिंगणीकर, मुकद्दर खा पठाण, प्रदीप देशमुख (सेवादल), प्रमोद दाळ, भैय्यासाहेब मेटकर, जयश्रीताई वानखडे, सतीश हाडोळे, श्रीकांत झोडपे, सेतू देशमुख, अजीज खान, राजाभाऊ टवलारकर, विनोद पवार, नामदेवराव तनपुरे, विनोद भालेराव, राजेश काळे, नंदू यादव, वीरेंद्रसिंह जाधव, अमित गावंडे, अरविंद लंगोटे, समाधान दहातोंडे तसेच जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिक्षक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.