Shiv Sena meeting in the presence of Uddhav Thackeray for Amravati division : शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मुंबईत बैठक, उद्धव ठाकरेंची उपस्थिती
Buldhana आगामी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)ने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुंबईतील मातोश्री निवासस्थानी १ ऑगस्ट रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती विभागातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यांतील खासदार, आमदार, संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख आदी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून आगामी निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “शिक्षक मतदारसंघात भगवा फडकवला पाहिजे.” हा फक्त राजकीय लढा नसून विचारांचा संग्राम आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील यंत्रणा मजबूत करून प्रचारात जोम आणण्याचे निर्देश त्यांनी दिले.
Raj Thackeray : मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभे राहू देणार नाही !
निवडणुकीसाठी उमेदवार ठरवण्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यात शिक्षकांशी संवाद साधण्याचे आणि त्यांच्या अडचणी समजून घेऊन विश्वासार्ह चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णयही बैठकीत झाला. शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेची ताकद अधोरेखित करायची असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे.
Education officials arrested : शिक्षणाधिकाऱ्यांच्या अटकेविरोधात शिक्षक संघटनांचा एल्गार
या बैठकीनंतर अमरावती विभागात शिवसेनेच्या हालचालींना वेग आला असून, येत्या काही दिवसांत जिल्हानिहाय बैठका व मेळावे आयोजित करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.








