Protest against cowardly attack by wearing black ribbon : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ ठाकरे गटाकडून आंदोलन
Buldhana जम्मू-काश्मीरमधील पहलगाम भागात घडलेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ ते २८ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Balasaheb Thackrey) पक्षाच्या बुलढाणा जिल्हा युनिटतर्फे आज संगम चौक येथे निदर्शने करण्यात आली.
“पाकिस्तान मुर्दाबाद”, “दहशतवाद्यांचा निषेध असो”, अशा घोषणा देत शिवसैनिकांनी हाताला काळ्या फिती बांधून आपला संताप व्यक्त केला. या निषेध आंदोलनात मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. दहशतवादाचा सर्वस्वी निषेध करून केंद्र सरकारने कडक भूमिका घ्यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
Jammu Kashmir terrorist attack : काश्मीरचं सौंदर्य घायाळ करणारं, पण आता ‘घायाळ’ व्हायला जाणार कोण ?
यावेळी शिवसेना प्रवक्त्या अॅड. जयश्रीताई शेळके, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, समन्वयक संदीपदादा शेळके, जिल्हा संघटक डि. एस. लहाने, वसंतराव भोजने, सहसंपर्कप्रमुख छगन मेहेत्रे, युवासेना जिल्हा प्रमुख नंदु कऱ्हाडे, लखन गाडेकर, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख संजीवनी वाघ, प्रा. आशिष रहाटे, सुनील घाटे, मोहम्मद सोफियान, बद्रि बोडखे, तुकाराम काळपांडे यांच्यासह शिवसेनेच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.








