Thackeray alliance : मनसे – ठाकरे गटाच्या जागावाटपाचा चर्चा निर्णायक टप्प्याकडे

Uddhav Thackeray ready to give around seventy seats to MNS : उद्धव ठाकरे मनसेला सत्तरच्या आसपास जागा देण्यास तयार

Mumbai: मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संभाव्य युतीच्या चर्चांना वेग आला असून दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचा पहिला टप्पा सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मनसेला सुमारे सत्तर जागा देण्यास तत्त्वतः तयार असल्याचे संकेत मिळाले आहेत. अद्याप अधिकृत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नसला तरी याबाबतच्या बैठका सलगपणे पुढे नेण्याचे दोन्ही पक्षांनी ठरवले आहे.

मनसेने याआधीच मुंबईतील प्रभाव असलेल्या सुमारे १२५ प्रभागांची यादी तयार केली असून या प्रभागांमध्ये पक्षाची लढण्याची तयारी पूर्ण आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सुचवलेल्या सत्तरच्या आसपास जागांवर मनसे समाधानी राहील का हा महत्त्वाचा प्रश्न युतीच्या पुढील वाटचालीत निर्णायक ठरणार आहे.

MH Motors scam : नागपुरात एमएच मोटर्सचा कोट्यवधींचा घोटाळा; डीसीपींची तात्काळ कारवाई !

आरक्षण जाहीर झाल्यानंतर दोन्ही पक्षांची रणनीती अधिक स्पष्ट होत असून उद्धव ठाकरे मनसेसोबत युती करण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र जागावाटपात पक्षाची ताकद अबाधित ठेवण्याची त्यांची काळजी स्पष्ट दिसते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई असल्याने दोन्ही बाजू अतिशय सावधपणे पावले टाकत आहेत.

प्रारंभिक चर्चेनंतर आता दुसऱ्या फेरीत अधिक सखोल वाटाघाटी होणार असून या बैठकींमधून युतीचा अंतिम आकार ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

——————-