Welcoming the arrival of the girls, a change in the mindset of the generation of boy : लेकींच्या आगमनाचे स्वागत, ‘वंशाला दिवा’च्या मानसिकतेत बदल
Wardha News : ‘वंशाला दिवा’च हवाय म्हणून कोवळ्या कळ्यांना गर्भातच कुस्करले गेले. परिणामी मुलींचा जन्मदर घटला. त्यामुळे समाज मनातून चिंता व्यक्त व्हायला लागली. गर्भलिंग निदानाचे कायदे कडक करण्यात आले. वंशाच्या दिव्यासोबतच लेकीही प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत. याचा सकारात्मक परिणाम म्हणून जिल्ह्याला यंदा लक्ष्मी पावली आहे. शंभर मुलांच्या मागे मुलींचा जन्मदर ९५ इतका आला आहे.
एप्रिल ते डिसेंबर २०२४ या नऊ महिन्यांच्या कालावधीत शासकीय व खासगी रुग्णालयांत एकूण १० हजार ९३ मुलांनी जन्म घेतला. यात ५ हजार १६१ मुलांचा, तर ४ हजार ९३२ मुलींचा समावेश आहे. मुलगी नको, मुलगाच हवा, हा अट्टहास आता हळूहळू कमी होत चालला आहे. वंशाला दिवा नसला तरी अनेक पालक आता एका मुलीवरच पाळणा थांबवत आहेत.
Soybean crop : सोयाबीन विकले तीन हजार आठशेत; तुरीचे दर सात हजारांच्या खाली !
मुलगी झाली म्हणून काय झालं, तिलाही शिकवू आणि मोठे करू, असा निश्चय करत आहेत. शिक्षण, आरोग्य, नाट्य, कला, क्रीडा, संशोधन, सुरक्षा यांसह अन्य क्षेत्रांतही लेकी उंच भरारी घेऊन आपल्या परिवाराचे नाव उंच करीत आहे. जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढत असला, तरी मागील नऊ महिन्यांत वर्धा, आर्वी आणि कारंजा तालुके मात्र माघारले आहेत. प्रत्येक तालुक्यात मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी, यासाठी आरोग्य माघारलेल्या तालुक्यात जनजागृती करणे आवश्यक आहे.
आशेचा किरण उगवला, भेदभाव दूर झाला
मुली प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेत असल्याने प्रत्येकच कुटुंबात आशेचा नवा किरण उगवला आहे. पूर्वी वंशाचा दिवा पुढे जावे, असा अट्टहास होता. मात्र, भेदभाव दूर झाला. आशेचा किरण उगवला, भेदभाव दूर झाला.
Ramdas Tadas : कुस्तीत कलर होल्डर पटकाविणारी खुशाली ठरली द्वितीय मल्ल !
गर्भलिंगनिदानाचे नियम कठोर
गर्भलिंगनिदान करून मुलगी असल्यास गर्भपात केला जायचा. यामुळे मुलींचा जन्मदर घटत असल्याने चिंता निर्माण व्हायला लागली. यामुळे शासनाने गर्भलिंग निदानाचे नियम कठोर केले. त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे.
‘बेटी बचाव, बेटी पढाव’चाही फायदा
शासनाने ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चा नारा दिला. कन्यारत्नांच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या. शिक्षण घेणाऱ्या मुलींना सवलती दिल्या जात आहेत. दहावी आणि बारावीच्या निकालात कन्यारत्नच बाजी मारत असल्याची उदाहरणे आहेत.
१० हजार ९३ मुला-मुलींचा जन्म
एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत १० हजार ९३ मुला-मुलींचा जन्म झाला. यात ५ हजार १६१ मुले, तर ४ हजार ९३२ मुलींचा समावेश आहे. यात मुलींचा जन्मदर हजारामागे ९५० असा आहे. आष्टी, हिंगणघाट या तालुक्यांत मुलींचा जन्मदर जास्त आहे.
वर्षभारत किती मुले जन्मली?
तालुका मुले मुली एकूण
वर्धा ३८९४ ३६७१ ७५६५
सेलू २४ २३ ४७
आर्वी २९० २७० ५६०
आष्टी २४ ३२ ५६
देवळी ६५ ६१ १२६
हिंगणघाट ६६० ६९९ १३५९
कारंजा १७० १४३ ३१३
समुद्रपूर ३४ ३३ ६७
हिंगणघाट तालुक्यात मुलींचा जन्मदर सर्वाधिक
तालुका मुलीचा जन्मदर
वर्धा ३६७१
सेलू २३
आर्वी २७०
आष्टी ३२
देवळी ६१
हिंगघाट ६९९
कारंजा १४३
समुद्रपूर ३३