The boy left home because father said ‘Don’t watch instagram reels’ : पोलिसांनी आणून दिले घरी; अकराव्या वर्गाचा विद्यार्थी
Nagpur सोशल मीडियाच्या आहारी जाणाऱ्यांमध्ये आज प्रत्येक वयोगटातील व्यक्ती आहे. पण किशोरवयीन मुलांचे आहारी जाणे आता सामाजिक धोका होऊन बसला आहे. वडिलांनी रिल्स बघू नकोस म्हटले म्हणून अकराव्या वर्गाचा विद्यार्थी घर सोडून गेला. नागपुरातील या घटनेने या संदर्भात अधिक चर्चेला वाट मोकळी करून दिली आहे.
परीक्षा जवळ आल्याने ‘इंस्टा रिल्स’ बघण्याऐवजी अभ्यासावर लक्ष दे. असे बजावल्यानंतरही मुलगा इंस्टाग्राम वापरताना दिसल्यामुळे वडिल मुलावर रागावले. मोबाईल बघण्यास मज्जाव केल्यामुळे मुलगा रागाच्या भरात घर सोडून गेला. थेट छत्तीसगढ गाठले. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाने मुलाचा शोध घेऊन समूपदेशन केल्यानंतर पालकांच्या ताब्यात दिले.
Eknath Shinde Shivsena: पटेल, पटोलेंच्या गडात शिंदेसेनेची मोर्चेबांधणी !
पीडित मुलगा अकराव्या वर्गाचा विद्यार्थी आहे. त्याचे वडिल ट्रक driver आहेत. ते वेगवेगळ्या राज्यांत दौऱ्यावर असतात. त्यामुळे ते महिन्यातून दोनदा घरी येतात. जय हा दोन जुळ्या बहिणी आणि आईसोबत राहतो. त्याला कोरोना काळात अभ्यासासाठी वडिलांनी ‘स्मार्टफोन’ घेऊन दिला होता. तेव्हापासून तो social media वर active आहे. त्याने फेसबुक, व्हॉट्सअपवर आणि इंस्टाग्रामवर रिल्स बघणे सुरु केले.
त्याला मोबाईलचे एवढे व्यसन जडले की तो जेवण करताना किंवा शौचालयातसुद्धा मोबाईल सोबत नेत होता. मुलगा नेहमी मोबाईलवर व्यस्त राहत असल्यामुळे आईवडिलांनी त्याला अनेकदा आरडाओरड केली. मात्र, त्याच्यात सुधारणा झाली नाही. परीक्षा जवळ आल्यामुळे वडिलांनी त्याला ‘इंस्टावर रिल्स’ बघणे बंद करुन अभ्यास करण्यास बजावले होते. त्यावर त्याने होकार देऊन भ्रमणध्वनी वापरणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर वडिल १५ दिवसांसाठी बाहेर राज्यात ट्रक घेऊन निघून गेले.
वडिल घरी आल्यावर मुलाचा अभ्यास कसा सुरु आहे, हे तपासण्यासाठी खोलीत शिरले. त्यांना मुलगा ‘इस्टाग्रामवर रिल्स’ बघताना दिसला. त्यामुळे वडिलांचा पारा चढला. ‘रिल्स बघू नकोस. अभ्यासाला वेळ दे, असे बजावल्यानंतरही तू रिल्स का बघत आहेस?’ असा प्रश्न केला. तसेच त्याला रागावले. त्यानंतर त्यांनी पत्नीवरही आरडाओरड केली. त्यामुळे घरातील वातावरण तापले.
Manikrao kokate : कृषिमंत्र्यांच्या वक्तव्यावर भडकली वंचित !
रागावल्यामुळे मुलाने घर सोडण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या राज्यात जाऊन कामधंदा करुन किंवा नोकरी करुन आईवडिलांपासून दूर राहण्याचे त्याने ठरविले. ११ फेब्रुवारीला सायंकाळी त्याने रेल्वेस्थानक गाठले. तो रायपूर शहरात पोहचला आणि तेथे कामाच्या शोधात निघाला. मात्र, तेथे कुणीही त्याला काम देत नव्हते.
तो पुन्हा रेल्वेेस्थानकावर आला. रेल्वेने नागपूरकडे जाणाऱ्या एका नातेवाईकाच्या नजरेस पडला. त्यांनी त्याला नागपुरात आणले. मात्र, तो घरी गेला नाही. शेवटी गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक ललिता तोडासे यांच्या पथकाने त्याला कळमना मार्केटमधून ताब्यात घेतले. त्याचे समूपदेशन करुन पालकांच्या ताब्यात दिले.








