Breaking

Sudhir Mungantiwar : आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या ऐतिहासिक कार्याची पुन्हा होतेय आठवण !

The historic work done by Mungantiwar was once again remembered : लंडनहून भारतात आणलेली वाघनखे उद्या येणार नागपुरात

Nagpur : छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारले तरी धमण्यांमध्ये उत्साह आणि शंभर हत्तींचे बळ संचारते. महाराष्ट्राचे दैवत असलेल्या शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनच्या संग्रहालयातून भारतात आणली गेली. हे महान कार्य तत्कालीन वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हातून घडले. त्यांच्याच कल्पक बुद्धीतून आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांतून यशस्वी झाले. आता ही वाघनखे उद्या (७ फेब्रुवारी) नागपुरात आणली जाणार आहेत. अशावेळी आ.मुनगंटीवार यांच्या ऐतिहासिक कार्याची वारंवार आठवण केली जात आहे.

महाराजांची वाघनखे राज्याची उपराजधानी नागपुरात येणार आहेत. तमाम नागपुरकरांना वाघनखांसह शिवशस्त्र शौर्य गाथा प्रदर्शनही बघता येणार आहे. यामुळे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या ऐतिहासिक कामगीरीची महाराष्ट्रातीर जनतेला पुन्हा एकदा आठवण झाली आहे. भारताचे ‘सेंटर पॉइंट’ असलेल्या झीरो माईलशेजारी मध्यवर्ती संग्रहालय आहे. त्याठिकाणी ही वाघनखे ठेवण्यात येणार आहेत. हे संग्रहालय अजब बंगला या नावानेसुद्धा ओळखले जाते. शिवकालीन शस्त्र प्रदर्शनासाठी येथे स्वतंत्र हॉल उभारण्यात आला आहे. येथे एकाच वेळी ५० लोकांना हे प्रदर्शन बघता येणार आहे.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या मागणीवर ‘हनुमंतांनी’ दिले आश्वासन !

शिवकालीन शस्त्रांची प्रात्याक्षिके
वाघनखांसह शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे उद्धाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्य समारंभ रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात होईल. शिवकालीन शस्त्र दालनामध्ये वाघनखे, विविध प्रकारच्या तलवारी, ढाली, महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेला दांडपट्टा, अग्नीबाण आदी महत्वपूर्ण शस्त्रास्त्र पाहता येतील. अग्नीबाण हा राज्याच्या केवळ नागपूर येथील संग्रहालयात उपलब्ध आहे. या ठिकाणी विविध मर्दानी खेळ व शिवकालीन शस्त्रांची प्रात्याक्षिके सादर केली जाणार आहेत.

स्वराज्याचा शत्रू असलेल्या अफजलखानाचा कोथळा महाराजांनी ज्या वाघनखांनी काढला होता. हीच ती वाघनखं. महाराष्ट्राच्या राजकारणात समाजाच्या तळागळातील प्रश्नांची जाण त्यांना जाण आहे. ते अत्यंत अभ्यासू पद्धतीने प्रत्येक मुद्दा संसदीय पटलावर मांडतात. विधिमंडळात दिलेला शब्द पूर्ण करणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ख्याती आहे. आ.मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनहून महाराष्ट्रात आणण्याचा शब्द दिला होता. तो त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातच पूर्ण केला. त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांचे राज्यातील शेकडो शिवप्रेमी संस्था, लाखो शिवप्रेमींकडून स्वागत केले जात आहे.

संकल्पपूर्तीचे समाधान
देव, देश आणि धर्मासाठी लढून स्वराज्य हितासाठी लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही दैवत मानतो. छत्रपती शिवाजी महाराज या नावातच ऊर्जा आहे, बळ आहे, शक्ती आहे. महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला. हा इतिहास रोमांच उभा करणारा आणि महाराष्ट्रातील पिढ्यानपिढ्या शौर्यवान व बलवान करणारा आहे. म्हणूनच ही वाघनखे स्वराज्य भूमीत आणण्याचा संकल्प केला होता आणि तो पूर्ण झाला, याचे समाधान असल्याचे मुनगंटीवार म्हणतात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात हे शक्य झाले, अशी भावना सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात आणली गेली आहेत. 19 जुलैपासून सातारा येथे संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. आता नागपुरकरांना उद्या सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळात ती पाहता येणार आहे.

Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचं लक्ष प्रशासन दक्ष!

कबरीचे अतिक्रमण काढले
सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून मुनगंटीवार यांनी पदभार सांभाळल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त विविध अभिनव उपक्रम राबविले. त्यानंतर केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं जाईल असे उपक्रम आयोजित केले.

नोंद घ्यावी असे कार्य
बऱ्याच वर्षांपासून प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीच्या ठिकाणी झालेले अतिक्रमण दिनांक १० नोव्हेंबर २०२२ रोजी सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने वन विभागामार्फत हटविण्यात आले. दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी आग्रा येथील औरंगजेबाच्या दिवाण ए खास या महालामध्ये शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. त्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तत्कालिन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. राज्याभिषेकाच्या एक महिना अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथील भवानी मातेच्या मंदिरामध्ये भवानी मातेसाठी छत्र अर्पण केले होते. त्या घटनेचे औचित्य साधून सुधीर मुनगंटीवार यांनी २१ मे २०२३ रोजी प्रतापगड येथील भवानी मातेस चांदीचे छत्र अर्पण केले.

Nitin Gadkari : राजकारण हेच समाजकारण अन् धर्मकारण!

२०२३ च्या रायगड येथील शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी देशभरातील विविध ठिकाणचे पवित्र जल एकत्र करून सहस्त्रजलकलश यात्रा २६ मे २०२३ रोजी राजभवन येथून सुरू करण्यात आली व या जलाद्वारे रायगड येथे दिनांक २ जून २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी जलाभिषेक करण्यात आला. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतो. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक चांदीच्या पालखीतून काढण्यात येते. या मिरवणूक सोहळ्यासाठी चांदीची पालखी सुधीर मुनगंटीवार यांच्यामार्फत रायगड उत्सव समितीस भेट देण्यात आली.

१ जून २०२३ रोजी गेट वे ऑफ इंडिया, मुंबई येथे राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागामार्फत शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विशेष लोगोचे प्रसारण करण्यात आले. या लोगोचा वापर राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यावर्षी किल्ले रायगड येथे दिनांक २ जून २०२३ रोजी तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला. दिनांक ६ जून २०२३ रोजी शिवराज्याभिषेक वर्षाच्या निमित्ताने “शिवकालीन होन” या विशेष टपाल तिकिटाचे राजभवन मुंबई येथे अनावरण करण्यात आले.

Sudhir Mungantiwar : भारताच्‍या सर्वसमावेशक विकासाचा संकल्‍प

मंत्रालयात सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली द्वारे दररोज सकाळी शिवविचार प्रसारणास १८ ऑगस्ट २०२३ पासून सुरुवात झाली. तेव्हापासून मंत्रालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी एक शिवविचार सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना ऐकवण्यात येतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांच्यावरील विशेष टपाल तिकिटाचे अनावरण दिनांक १८ ऑगस्ट २०२३ रोजी मंत्रालयात करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधासाठी वापरलेली वाघनखे लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मध्ये होती. ती वाघनखे भारतात आणण्याच्या सामंजस्य करारावर ३ ऑक्टोबर २०२३ रोजी स्वाक्षरी करण्यात आली होती. जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे भारतीय आर्मीच्या बेसवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ रोजी बसविण्यात आला.

दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री मासाहेब जिजाऊ यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांचे जन्मस्थळ सिंदखेडराजा, जिल्हा बुलढाणा येथे विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्याचे प्रयोग प्रत्येक जिल्ह्यात करण्यात आले. आ.सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्र राज्याचे वित्त व नियोजन मंत्री असताना त्यांच्या पुढाकारातून श्री शिवाजी मेमोरियल कमिटी, श्रीशैल्यम, आंध्र प्रदेश यांच्या मागणीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे श्रीशैल्यम येथे ध्यानमंदिर बांधण्यासाठी रुपये ३ कोटी ३८ लाख एवढी आर्थिक मदत महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात आली होती.