Breaking

Rape crimes decreased, but concern remains : बलात्काराचे गुन्हे घटले, पण चिंता कायम !

The issue of women’s safety is a challenge for the police : महिला सुरक्षेचा मुद्दा पोलिसांसाठी आव्हानात्मक

Amravati महिलांविरोधात घडणाऱ्या गुन्ह्यांची संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी झाली आहे. पण तरीही चिंता कायम आहे. महिला अजूनही असुरक्षित आहेत. बलात्कार, विनयभंग, कौटुंबिक छळ यांसारख्या गुन्ह्यांचे प्रमाण चिंताजनक आहे. शहर आयुक्तालयातील दहा पोलिस ठाण्यांमध्ये २०२४ मध्ये बलात्काराचे ९९ आणि विनयभंगाचे २४४ गुन्हे नोंदविण्यात आले. तुलनेत २०२३ मध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये २० ने, तर विनयभंगाच्या तक्रारींमध्ये ११४ ने घट झाली आहे.

२०२४ मध्ये अल्पवयीन मुलींवरील बलात्कार व विनयभंगाच्या १३४ घटनांची नोंद झाली. ही संख्या २०२३ मध्ये १७१ होती, तर २०२२ मध्ये १६० घटनांची नोंद झाली होती. २०२४ मध्ये महिला सेलमध्ये समेट साधता न आल्यामुळे पती आणि सासरच्या मंडळींविरुद्ध १५० महिलांनी तक्रारी नोंदवल्या, ज्यावर कौटुंबिक छळाचे गुन्हे दाखल झाले. २०२३ मध्ये हा आकडा १४८ होता.

Love story of teenager : पटना आयी नागपूर.. फिर भी न मिला सजना !

शहरातील दहा पोलिस ठाण्यांमध्ये २०२४ मध्ये मुला-मुलींना फूस लावून पळवून नेल्याच्या १२६ घटनांची नोंद झाली. यापैकी १२१ प्रकरणे उघड करण्यात पोलिसांना यश आले. २०२३ मध्ये अशा १२१, तर २०२२ मध्ये १११ घटना घडल्या होत्या.

२०२४ मध्ये महिलांच्या विनयभंगाच्या २४४ घटनांमध्ये २३० प्रकरणे उघड झाली असून, आरोपींना अटक करण्यात आली. २०२३ मध्ये या घटनांचा आकडा ३५८ होता. याशिवाय, २०२४ मध्ये बलात्कार व पॉक्सो कायद्यांतर्गत ५०, तर विनयभंग व पॉक्सो अंतर्गत ७६ गुन्ह्यांची नोंद झाली. तुलनेत २०२३ मध्ये बलात्कार व पॉक्सो अंतर्गत ७६ आणि विनयभंग व पॉक्सो अंतर्गत ९५ गुन्हे नोंदविण्यात आले होते.

NDRF centre in Nagpur : संकटांशी दोन हात करण्याचे प्रशिक्षण नागपुरातून !

२०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये महिलाविषयक गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. मात्र, पोलिस आयुक्तालय महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी २४ बाय ७ कार्यरत आहे, असं पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.