Breaking

DBT portal process in Government scheme : साडेपाच हजार जणांचे अनुदान रखडणार

The subsidy of five and a half thousand people may stop : कागदपत्रांअभावी वंचित राहण्याचे संकट

Wardha शासनाच्या विविध योजनांमुळे राज्यातील पात्र निराधार व्यक्तींना दिलासा मिळतो. मात्र, हा लाभ मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अर्थसाहाय्याचे वितरण हे डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्यांना अनुदानाच्या रकमेपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.

लाभासाठी योजनांच्या सध्याच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करण्यात याव्यात, असे राज्य शासनाने निर्देश दिले आहेत. राज्य सरकारने संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ योजना अशा या दोन्ही योजनांसाठी जिल्हाभरात ७५ हजार ८४२ लाभार्थ्यांच्या अनुदान वितरणासाठी मंजुरी दिली आहे.

Molesting of a minor girl : संतप्त महिला पोलीस अधिक्षक कार्यालयावर धडकल्या!

शासनाने डीबीटी अंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. यात लाभार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट असणे आवश्यक आहे. आधार व्हॅलिडिटी नसल्याने लाभार्थ्यांची डीबीटी पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी काही अडचण असेल. तर तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागात जाऊन माहिती जाणून घेता येते.

डिसेंबर, जानेवारी महिन्याचे अनुदान डीबीटी पद्धतीने वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार डीबीटी पोर्टलवर नोंद झालेल्या व आधार कार्ड अपडेट असलेल्या व बँकेत लिंक असलेल्या लाभार्थ्यांना थेट खात्यात लाभ वितरण होईल. मात्र, जे लाभार्थी ही प्रक्रिया करणार नाहीत, त्यांची अडचण होणार आहे.

Molesting of a minor girl : संतप्त महिला पोलीस अधिक्षक कार्यालयावर धडकल्या!

संजय गांधी निराधार योजनेचे २ हजार ३० आणि श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेचे ३ हजार ३५६ असे दोन्ही मिळून सुमारे ५ हजार ३८६ लाभार्थ्यांचे आधार कार्ड अद्यापही अपडेट झालेले नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांचे पैसे अडकण्याची शक्यता आहे. लाभार्थ्यांना संबंधित तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयातील या विभागात संपर्क करता येतो.