Breaking

Akola Zilla Parishad : जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना मिळेल मुदतवाढ ?

The tenure of Akola Zilla Parishad will end in January : 17 जानेवारीला कार्यकाळ संपुष्टात येणार

Zilla Parishad स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपत आला तरी नवीन निवडणूक होण्याची शक्यता कमीच आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांना मुदतवाढीचे वेध लागले आहेत. येत्या 17 जानेवारीला अकोला जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे मुदतवाढ मिळते की, प्रशासक नियुक्त केला जातो याबाबत उत्सुकता आहे.

अकोला जिल्हा परिषदेचा कार्यकाळ 17 जानेवारीला संपत आहे. विद्यमान अध्यक्ष संगीता आढाऊ यांनी अडीच वर्षांपूर्वी पदभार स्वीकारला होता. त्यापूर्वी प्रतिभा भोजने या अडीच वर्ष जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. 17 जानेवारी 2020 रोजी त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यानुसार विद्यमान जिल्हा परिषदेचा कार्यकाळ 17 जानेवारी 2025 रोजी संपत आहे. त्यापूर्वी निवडणुका होऊन नवीन पदाधिकारी निवडल्या जाणे आवश्यक होते.

न्यायालयीन प्रक्रियेत निवडणुका लांबणीवर पडल्या. आता जिल्हा परिषद व पंचायत समितीवर प्रशासक नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीने विद्यमान पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ द्यावी या दृष्टीने प्रयत्न चालवले आहे. त्यासाठी न्यायालयात तयारी सुद्धा केली आहे. यापूर्वीच राज्य शासनाने जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीला मदत वाढ दिली आहे.

Country Liquor : प्रचारात रिचवली 90 लाखाची ‘देशी’!

प्रशासकाची नियुक्ती होऊ शकते..

त्यामुळे राज्यातील 26 जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या सभापतींच्या आरक्षणाची सोडतही लांबणीवर पडली आहे. ते बघता राज्य शासन अकोल्यासह राज्यातील सहा जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांवर प्रशासक नियुक्त करू शकते. अकोला जिल्हा परिषदेचा राज्यातील वाशिम, धुळे, नंदुरबार, पालघर आणि नागपूर या जिल्हा परिषदेचा कार्यकाळ 17 जानेवारी रोजी संपत आहे. अमरावतीचा राज्यातील 26 जिल्हा परिषदांवर अडीच वर्षांपूर्वीच प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. या जिल्हा परिषदांना सुद्धा निवडणुकीचे प्रतीक्षा आहे.

जिल्हा परिषदेत सभांचे सत्र..

अकोला जिल्हा परिषदेची मुदत 17 जानेवारी रोजी संपत आहे. त्यामुळे विद्यमान सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीने सभांचे सत्र सुरू केले आहे. कार्यकाळ संपण्यापूर्वी जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा 13 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. या सभेमध्ये अनेक धोरणात्मक निर्णय घेतल्या जाण्याची शक्यता आहे.