Citizens ‘opened’ the underpass : सोमलवाडा आरयूबीची प्रतीक्षा संपली; लोकांचाही संयम सुटला
Nagpur अनेकदा एखादं काम पूर्ण व्हायला वेळ लागत नाही, पण त्याच्या उद्घाटनाच्या मुहूर्ताला नक्कीच वेळ लागतो. राजकीय पुढाऱ्यांच्या तारखा मिळेपर्यंत उद्घाटन होत नाही. नागपुरातील बहुप्रतिक्षीत अशा सोमलवाडा आरयूबी RUB च्या बाबतीत तेच घडले आहे. या अंडरपासचे काम पूर्ण झाले आहे. पण अनेक दिवस प्रतिक्षा करून नागरिकांचा संयम सुटला. त्यांनी हा अंडरपास वापरायला सुरुवात करून स्वतःच ‘उद्घाटन’ करून टाकले आहे.
महामेट्रोच्यावतीने Mahametro सोमलवाडा येथील आरयूबीचे काम पूर्ण झाले. मात्र मार्ग सुरू होत नसल्याने परिसरातील नागरिकांनी रोष व्यक्त केला. उद्घाटनापूर्वीच मार्गावरील वाहतूक सुरू केली. काही तास वाहतूक सुरू राहिल्यानंतर महामेट्रोकडून ही वाहतूक बंद करण्यात आली. १२ दिवसांनंतर सर्विस रोडचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरू होईल, असे महामेट्रोकडून सांगण्यात आले.
Revenue department tops in bribery : महसूल विभाग लाचखाेरीत अव्वल !
मनीषनगरचा एकच आरयूबी असल्याने वर्धा मार्गावरून मनीषनगरकडे जाणारेही याच आरयूबीचा वापर करत आहे. मात्र आता सोमलवाडा येथील नवीन आरयूबी तयार झाल्याने मनीषनगरकडे जाण्यासाठी दोन पर्याय खुले झाले आहे. मात्र सर्विस रोडचे काम व्हायचे असल्याने या पुलाचे लोकार्पण मागे पडत आहे. वाहतुकीचा ताण वाढत असल्याने सोमवारी परिसरातील नागरिकांनी या मार्गावर वाहने टाकत वाहतूक सुरू केली.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निधीच्या माध्यमातून महामेट्रो या आरयूबीचे काम करीत आहे. १२ दिवसांत काम पूर्ण होईल. त्यानंतर हा प्रकल्प महापालिकेला हस्तांतरित करण्यात येईल. आरयूबी सुरू करण्याचा निर्णय महापालिका घेईल, असे महामेट्रोकडून सांगण्यात आले.
नोव्हेंबर २०२३ मध्ये सोमलवाडा आरयूबीचे काम सूरू झाले होते. काम सुरू असताना काही काळासाठी या ठिकाणी रेल्वेचा वेग ताशी ४५ पर्यंत कमी करण्यात आला होता. ३२ कोटी रुपयांत हा प्रकल्प साकारण्यात आला. दोन पदरी असल्याने मनीषनगरकडे जाणाऱ्या आणि वर्धामार्गावर येणाऱ्यांसाठी हा सोईचा ठरेल. २२५ कामगारांनी हा पूल तयार केला. पादचारी मार्गही तयार केला असल्याने पायी चालणाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध झाली आहे. मात्र उर्वरित कामाला विलंब न लावता आरयूबी लवकर सुरू करा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली.