Ajit Pawars anger over a loan of Rs 1.5 crore : दीड कोटींच्या उधारीवर अजित पवारांचा संताप
Baramati : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले. बैठकीत पेट्रोल पंपाच्या उधारीचा मुद्दा समोर आला आणि त्यावरून अजित पवारांनी व्यवस्थापकांसह उपस्थित अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं.
बाजार समितीने तब्बल दीड कोटी रुपयांचं पेट्रोल-डिझेल उधारीवर दिल्याचं उघड झालं. हे ऐकताच अजित पवारांचा पारा चढला. “तू कशाला उधार देतोस? मी तुला तुरुंगात टाकेन हा, मी तुला सांगतोय,” अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना धमकी दिली.”तुमच्या काय बापाची आहे का मार्केट कमिटी? माझ्याही बापाची नाही, तुमच्याही बापाची नाही. ही संस्था शेतकरी, व्यापारी आणि हमालांची आहे,” असे पवार म्हणाले.
Local Body Elections : चुकीने काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले तर… बावनकुळेंना भीती !
ते पुढे म्हणाले, “एक महिना नाही, दोन महिने नाही… कुणा-कुणाची उधारी आहे ते दाखवा. मागच्या वेळी खरेदी विक्री संघ अडचणीत आला, पण पुढाऱ्यांनी भरपाई केली नाही. सर्वसामान्यांसाठी काढलेल्या संस्थांचा गैरवापर होऊ देणार नाही.”पेट्रोल-डिझेलची उधारी तातडीने थांबवण्याचे निर्देशही अजित पवारांनी या बैठकीत दिले.
___