Three new police stations : नागपूर जिल्ह्यात तीन नवे पोलिस स्टेशन्स होणार !

Due to the increasing population of Nagpur city and district, the Maharashtra government has taken decision : शहर आणि जिल्ह्याची लोकसंख्या वाढत चालल्यामुळे सरकारचा निर्णय

Nagpur : नागपूर हे महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर आहे. दिवसेंदिवस औद्योगिक आणि दळणवळणाच्या दृष्टीने नागपूर प्रगतीपथावर आहे. त्यात शहर आणि जिल्ह्याचे क्षेत्रफळ मोठे आहे आणि सीमा व लोकसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी राज्य सरकारने नागपूर जिल्ह्यात तीन नवे पोलिस स्टेशन्स निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर जिल्ह्यातील वडोदा, पाचगाव आणि कळमेश्वर पोलिस ठाण्यांचे विभाजन करून तीन नवे पोलिस स्टेशन तयार करण्यात येणार आहे. राज्य शासनाने यासाठी मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे. यासाठी राज्याचे महसूल मंत्री व नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत ही मंजुरी दिली आहे.

Ajit Pawar Vs Jayant Patil : ‘ते’ देखणं नेतृत्व, मग आम्ही काय देखणे नाही का?

नव्याने होणाऱ्या तीन पोलिस स्टेशन्ससाठी विविध संवर्गातील एकूण २१६ नियमित पदे तसेच बाह्य यंत्रणेद्वारे तीन सफाई कर्मचारी अशा पदांना मंजुरी देण्यात आली आहे. या पदनिर्मितीसाठी २४ कोटी २५ लाख रुपये आवर्ती आणि सहा कोटी दोन लाख रुपये अनावर्ती खर्चालासुद्धा शासनाने मंजुरी दिली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे तीन पोलिस स्टेशन्स व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.