A storm of anger erupted between BJP and Congress workers in Patna. : पाटण्यात भाजपा – काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा
Patna : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आरजेडी आणि काँग्रेसच्या संयुक्त सभेमध्ये अपशब्द आणि शिविगाळ केल्याच्या मुद्द्यावरून बिहारमध्ये वातावरण तापले आहे. यावरून शुक्रवारी पाटण्यात भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन केले. आंदोलनाच्या दरम्यान भाजपा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आमने-सामने झडप झाली आणि तुफान राडा झाला.
भाजपाचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोदींबाबत करण्यात आलेल्या अपशब्दांचा निषेध करत काँग्रेस कार्यालयावर हल्लाबोल केला. काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाचं गेट तोडून आत प्रवेश केला. यावेळी लाठीमार करण्यात आला, कार्यालयात उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली तसेच दगडफेकही झाली. या हल्ल्यात काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना दुखापत झाली असून एका कार्यकर्त्याचे डोकं फोडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Maratha movement : प्रतिष्ठेचा प्रश्न नाही, त्यांचं निवेदन आल्यावर चर्चा करू !
घटनास्थळी गोंधळ वाढल्याने मोठ्या संख्येने पोलिस दल तैनात करण्यात आले. पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न केला, मात्र काही वेळ वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण राहिले.
दरम्यान, बिहारच्या दरभंगा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या युवकाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याचे नाव रिजवी असल्याचे समजते. दरभंगामध्ये झालेल्या काँग्रेसच्या रॅलीदरम्यान त्याने मोदींबाबत अपशब्द उच्चारले होते. त्यानंतर राजकीय वातावरण तापले आणि भाजपाच्या आक्रमक आंदोलनाला सुरुवात झाली.
Maratha – OBC Movement : मराठा – ओबीसी आंदोलनांमुळे सरकारपुढे पेच !
या घटनेनंतर बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. भाजपाने काँग्रेस आणि आरजेडीवर पंतप्रधानांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे, तर काँग्रेसने भाजपावर हिंसाचाराचा ठपका ठेवला आहे. पुढील काही दिवसांत या वादाला आणखी राजकीय रंग चढण्याची चिन्हे आहेत.
____








