Tipeshwar Wildlife Sanctuary : टिपेश्वरमधील वाघाची बार्शीत दहशत

 

A tiger from Tipeshwar reached Solapur : मे महिन्यापासून वाघ होता बेपत्ता

Yavatmal पांढरकवडा येथील टिपेश्वर अभयारण्यातून बाहेर पडत एक वाघ सोलापूर जिल्ह्यात पोहोचला. येथील बार्शी तालुक्यात त्याने आता दहशत निर्माण केली आहे. गेल्या मे महिन्यापासून टिपेश्वर अभयारण्यातून हा वाघ दिसेनासा झाला होता. तो आता २० दिवसांपासून सोलापूर परिसरात भटकत असल्याची माहिती आहे. हा वाघ येथील टिपेश्वर अभयारण्यातीलच असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले.

टिपेश्वरमधून थेट सोलापूर जिल्हा गाठलेल्या या वाघाने बार्शी तालुक्यात धास्ती निर्माण केली आहे. तेथील वन विभागाने नवीन दिसणारा हा वाघ नेमका कुठला? यासाठी अनेक ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले. हा वाघ ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला. तो टिपेश्वरमधील असल्याचे दिसून आले. बार्शी परिसरातील येडशी, रामलिंग घाट जंगलात सध्या त्याचे बस्तान असल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यातून दिसून आले.

Akola BJP Membership : सत्तेचा उपभोग घेणारे वाढवू नका !

ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झालेल्या या वाघाचे छायाचित्र पडताळणीसाठी डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेकडे पाठविण्यात आले आहे. या संस्थेने वाघांची अनेक चित्रे तपासून त्याचा अभ्यास करून हा वाघ यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील असल्याचे सोलापूरच्या वन विभागला कळविले आहे.

Devendra Fadnavis on Mahametro : पुणेकरांना ‘नागपूर’बद्दल शंका होती !

 

अभयारण्याबाहेर येणारे वाघ हे शेतकऱ्यांसाठी धोक्याचे ठरतात. त्यामुळे हे वाघ शेतकऱ्यांचे टार्गेट ठरतात. अनेकदा सापळे लावून त्यांची शिकार केली जाते. पिकांच्या संरक्षणासाठी कुंपणाला लावलेल्या विद्युत तारेला स्पर्श होऊन त्यांचा मृत्यू होतो. हे प्रकार टळावे, यासाठी टिपेश्वर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याची गरज निर्माण झाली आहे. टिपेश्वर अभयारण्यात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या अभयारण्यात १८ ते २० वाघ वास्तव्य करीत आहे.

वाघांची संख्या सतत वाढत असल्यामुळे अधिवास क्षेत्र कमी पडत आहे. त्यामुळे १५ हजार हेक्टर जागेत विस्तारलेल्या अभयारण्यातील वाघ बाहेर निघत आहे. अनेक वाघ तारुण्यात आल्यावर मादीच्या शोधासाठी, तसेच आपले साम्राज्य निर्माण करण्यासाठी विविध ठिकाणी प्रवास करतात. सोलापूरच्या येडशी परिसरात आढळलेला वाघ हा टिपेश्वरचाच असून मागील वर्षी मे महिन्यात तो टिपेश्वरला अखेरचा दिसला होता. सध्या या वाघावर औरंगाबाद वन्यजीव विभागाचा सोलापूर प्रादेशिक वनविभाग लक्ष ठेवून आहे.