Under the leadership of Sudhir Mungantiwar, a 7 kilometers long Tiranga Yatra in Ballarpur : कणाकणांत मनामनांत देशभक्तीची अनुभूती
Chandrapur : जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिलला दहशदवाद्यांनी हल्ला केला. त्यानंतर १५ दिवसांतच भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत दहशतवादी आणि पाकिस्तानला सडेतोड प्रत्यूत्तर देऊन गुडघ्यावल आणले. भूदल, नौदल आणि वायुदलातील शुरवीर सेनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशभरात तिरंगा यात्रा काढल्या जात आहेत. आज (१८ मे) चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली.
बल्लारपुरातील यात्रेची लांबी ७ किलोमीटर होती आणि तेवढ्याच लांबीचा अखंड तिरंगा आणि जिप्सीवरील मिसाईल्सच्या प्रतिकृती यात्रेचे आकर्षण होते. तमाम भारतवासी आपल्या सैन्याच्या पाठीशी ताकदीने उभे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भक्कम पाठींबा सैन्याला आहे. त्यामुळे केवळ राजधानी, उपराजधानी, मोठी शहरेच नाही तर लहान – लहान गावांमध्येही नागरिक तिरंगा यात्रेत सहभागी होत आहेत. कारण या देशातील प्रत्येक जण सैन्याच्या पाठीशी उभा आहे. ही बाब कुठेतरी दर्शवली पाहिजे आणि हा संदेश पोहोचवला पाहिजे, यासाठी तिरंगा यात्रेचे आयोजन आहे, असे आमदार सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
Tiranga Yatra : ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या शौर्यासाठी बल्लारपूरात तिरंगा यात्रा !
जाज्वल्य देशभक्तीने ओतप्रोत अशी तिरंगा यात्रा आज बल्लारपुरात काढण्यात आली. भारत माता की जय, वंदे मातरम्, विविधतेत एकता, जय हो इंडिया, आय लव्ह माय इंडीया, जय हिंद की सेना, अशा घोषणा देत वेकोलिच्या काटा गेटवरून निघालेल्या या यात्रेचा समारोप नवीन बसस्थानक परिसरात झाला. या यात्रेत सहभागी झालेला प्रत्येक जण देशभक्तीने भारावलेला होता. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात यात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येक मनामनांत आणि मातीच्या प्रत्येक कणाकणांत देशभक्ती जागृत झाली. आमच्या देशाकडे वक्रदृष्टी टाकाल, तर तुमचा नायनायट करून टाकू, असा संदेशच जणू आजच्या तिरंगा यात्रेने शत्रुंना दिला.
यात्रेच्या समारोपप्रसंगी आमदार मुनगंटीवार यांनी पांडुरंग हेमके, वीर पत्नी संगीता इंगळे, सहदेव रामटेके, माजी सैनिक विजय शेंडे, मनोज ठेंगणे, हवालदार वीर बहादुर सिंग, जगदीश सिंग, मनोज यादव, विश्वेश्वर सरोज, जन बहादुर सिंग सरोज या माजी सैनिकांचा सत्कार केला. सर्वधर्म समभावाची ही यात्रा होती. यामध्ये सर्व धर्मगुरू सहभागी झाले होते. भंतेजी भागीरथ, अल्ताफ भाई, मनीषजी महाराज, सादिक जवेरी, सुनील पास्टर, दलजीत सिंह कलसी आदी सर्वधर्मीय गुरुंचा सत्कारही आमदार मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला.