Breaking

Torture for money : पुण्यातील वैष्णवी हगवणे नंतर अमरावतीत शुभांगी तायवाडेची आत्महत्या !

After Vaishnavi Hagavane in Pune, Shubhangi Taywade commits suicide in Amravati : पती व सासू चौकशीसाठी गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात

Amravati : पुणे येथे हुंड्यासाठी सासरकडून होत असलेल्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली. या घटनेची शाई अजून वाळलीही नाही, तोच पुण्यातीलच पिंपरी चिंचवड येथे एका २२ वर्षीय विवाहितेने हुंड्याच्या जाचापाईच आत्महत्या केली. माहेरच्या लोकांनी दुचाकीसाठी ५० हजार रुपये न दिल्याने तिचा छळ सुरू होता. दोन्ही घटना ताज्या असताना अमरावतीमध्ये शुभांगी तायवाडे या ३० वर्षीय महिलेने आत्महत्या केली आहे.

हुंड्यासाठी छळ करण्याचे सत्रच जणू महाराष्ट्रात सुरू झाले आहे. एका पाठोपाठ एक विवाहितांच्या आत्महत्यांच्या घटना घडत आहेत. शुभांगीने पतीकडून होत असलेल्या छळाला कंटाळून गळफास लाऊन आत्महत्या केली आहे. अमरावती शहरातील जय भोले कॉलनी परिसरात ही घटना आज (ता. २५ मे) सकाळी घडली. शुभांगीचा पती निलेश तायवाडे हा सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये सिनीअर मॅनेजर पदावर कार्यरत आहे. तर शुभांगी आरोग्य विभागात कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या पदावर कार्यरत होती.

Teacher recruitment scam : शिक्षक भरती घोटाळ्याचा उगम अमरावतीतच; प्रशासन, लोकप्रतिनिधींचे मौन

निलेश आणि शुभांगीचा विवाह चार वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना तीन वर्षांची एक आणि एक वर्षाची एक, अशा दोन मुली आहेत. लग्नानंतर काही दिवसांतच निलेशने शुभांगीचा छळ करणे सुरू केले होती. या त्रासामुळेच शुभांगीने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या आईवडीलांनी केला आहे. शुभांगीचे प्रेत शवविच्छेदनासाठी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. जोपर्यंत शुभांगीचा लहान भाऊ येत नाही, तोपर्यंत शवविच्छेदन करू नये, अशी कुटुंबीयांची मागणी आहे.

Zilla Parishad : झेडपीची प्रारूप प्रभाग रचना प्रक्रिया पुढील आठवड्यानंतर?

शुभांगीने आत्महत्या केली नाही, तर निलेशनेच तिला फासावर लटवले, असा आरोप शुभांगीची आई आणि वडील राजेंद्र तुरकाने यांनी केला आहे. आता या प्रकरणाचा तपास गाडगेनगर पोलीस करत आहेत. शुभांगीची सासू आणि पती निलेशला गाडगे नगर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.