Toxic cough syrup : चिमुकल्यांना विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या डॉक्टरला बेड्या

Three children face problem in Nagpur, administration on alert mode : नागपुरातही तीन बालकांची मृत्यूशी झुंज, प्रशासन सतर्क मोडवर

Nagpur: मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात ‘कोल्ड्रिफ’ या कफ सिरपमुळे १० बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी उपचार करणारे डॉक्टर प्रवीण सोनी यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर बेकायदेशीरपणे सिरपचे वितरण आणि निष्काळजीपणे उपचार केल्याचा आरोप असून, त्यांच्या विरोधात बीएनएस २७६, बीएनएस १०५ आणि ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स कायद्याच्या कलम २७अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छिंदवाड्यातील पारसिया येथे ५ वर्षांखालील मुलांच्या मृत्यूचे कारण सुरुवातीला अ‍ॅक्यूट इन्सेफलायटीस सिंड्रोम असल्याचे समजले होते. मात्र, वैद्यकीय अहवालानुसार हे मृत्यू अ‍ॅक्यूट किडनी इंज्युरी मुळे झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोल्ड्रिफ कफ सिरप घेतल्यानंतर अनेक बालकांची प्रकृती अचानक बिघडली होती. आतापर्यंत १० बालकांचा मृत्यू झाला असून, आणखी सहा बालकांची प्रकृती नाजूक आहे. छिंदवाड्यातील काही बालकांवर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

New equation : महायुतीविरोधात नव्या समीकरणांची सुरुवात!

दरम्यान, राजस्थानमध्येही तीन बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे, तर नागपुरात डायलिसिस आणि व्हेंटिलेटरवर तीन बालके जीवासाठी झुंज देत आहेत. “४ सप्टेंबरपासून नऊ मुलांचा मृत्यू झाला असून त्यात शिवम राठोड, विधी, अदनान, उसैद, ऋषिका, हितांश, चंचलेश, विकास आणि संध्या यांचा समावेश आहे,” अशी माहिती सुपर-विभागीय दंडाधिकारी शुभम कुमार यादव यांनी दिली. सध्या छिंदवाडा आणि नागपूर येथे अन्य १३ मुलांवर उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर बालऔषधांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू आणि केरळ सरकारांनी ‘कोल्ड्रिफ’ कफ सिरपच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे. तामिळनाडूतील औषध निर्मिती कंपनीने मध्य प्रदेश व राजस्थानला पुरवलेल्या साठ्यात भेसळ आढळल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

नागपुरात अन्न व औषध प्रशासन विभागाने तातडीने हालचाल करत काही स्टॉकिस्टकडे कफ सिरपचा साठा तपासला आहे. संशयित सिरपचा साठा विक्रीसाठी जाऊ नये म्हणून संबंधित औषध विक्रेत्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही-पुणे) आणि इतर राष्ट्रीय संस्थांनी घेतलेल्या नमुन्यांच्या तपासणीत पाणी, विषाणू किंवा अन्य कारणे नाकारण्यात आली आहेत. सर्व मृत बालकांच्या वैद्यकीय इतिहासात ‘कोल्ड्रिफ’ कफ सिरपचा वापर सामान्य आढळला आहे, हे लक्षात घेता या सिरपमधील घटकच विषारी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Reservation controversy : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ओबीसी नेत्यांचा संताप!

डॉ. प्रवीण सोनी यांच्या चौकशीला वेग आला असून, औषध कंपनीच्या अधिकाऱ्यांवर आणि संबंधित वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. नागपुरासह संपूर्ण राज्यात आरोग्य विभाग आता अलर्ट मोडवर असून, संशयास्पद औषधांचा पुरवठा आणि विक्री रोखण्यासाठी व्यापक तपास सुरू आहे.