No one stops these vehicles anywhere in the country : फिरस्तीवर राहणाऱ्या चालकांसाठी विशेष सुविधा
Wardha नोकरी, व्यवसाय अथवा पर्यटनानिमित्त सतत परराज्यात प्रवास करणाऱ्या नागरिकांना सुविधेसाठी परिवहन विभागाने बीएच सीरिज सुरू केली आहे. या सीरिजच्या माध्यमातून संबंधित वाहनाला क्रमांक दिला जातो. यासाठी आरटीओ कार्यालयामध्ये वाहन मालकाला ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. जिल्ह्यातील ५० हून अधिक वाहन मालकांनी बीएच सीरिजमध्ये क्रमांक घेतले आहेत.
सेंट्रल गव्हर्नमेंट तसेच मल्टीस्टेट ओनर कंपनी ज्यांची एक ते दोन राज्यांमध्ये कार्यालये आहेत, कार्यक्षेत्र आहेत, त्यांच्या वाहनांसाठी या सीरिजचे क्रमांक घेतले जातात. राज्य बदलले तरी वाहनाचा नंबर तोच राहतो. यात या वाहनांसाठी वेगळा टॅक्स लागत नाही. बीएच क्रमांक घेतल्यावर आरटीओ किंवा पोलीस तुम्हाला अडवणार नाहीत.
२५ लाख किंवा त्यापेक्षा जास्त किमतीचे चारचाकी वाहन तसेच दोन लाख किंवा त्यापेक्षा जास्त किमतीचे दुचाकी किंवा नंबर प्राप्त करण्यासाठी बँक खात्याचे विवरणपत्र तपासले जाते. बीएच सीरिजचा लाभ एका व्यक्तीस केवळ एका वाहनासाठी दिल्या जातो. तसेच कर भरणा केलेला आहे की नाही, याची तपासणी केली जाते. सर्व बाबींची पडताळणी करूनच हा क्रमांक वाहनाला दिला जातो.
बीएच सीरिजचा वाहन क्रमांक घेण्यासाठी ज्या राज्यातील जिल्ह्यात स्थलांतर झाले आहे तेथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून हा नवीन पद्धतीचा क्रमांक तुमच्या वाहनासाठी घेता येऊ शकतो.
Nagpur Police : व्वाह रे नागपूर! हेल्मेट न घालणारे अडिच लाखांनी वाढले
बीएच सीरिजच्या वाहनांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वाहन मालकांनी आरटीओ विभागाकडे याबाबत नोंदणी केली. त्यानुसार आतापर्यंत एकूण ५० वर वाहनांची नोंदणी झाली आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचना प्रसिद्ध करून स्थलांतरित वाहनांसाठी भारत सरकारने बीएच सीरिज (भारत सीरिज) सुरू केली आहे. त्या अंतर्गत वाहनांची नोंदणी केली जाते.
यात नोकरी किंवा व्यवसायासाठी दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर प्रवासासाठी स्वतःचे वाहन नेल्यास त्या राज्यातील परिवहन विभागाच्या नोंदणीशिवाय वाहन चालविणे कठीण असते.