Appeal of tribal servant Baban Goraman for the upliftment of the society : सामाजिक भेदभाव आणि पोलिसांच्या छळामुळे समाज आजही भटक्या जीवनशैलीवर अवलंबून
Nagpur : स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही पारधी समाज सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या उपेक्षित आहे. ब्रिटिश राजवटीत ‘क्रिमिनल ट्राइब्स ॲक्ट’ अंतर्गत या समाजाला गुन्हेगारी जमात ठरवून सामाजिक कलंक लावण्यात आला. स्वातंत्र्यानंतर हा कायदा रद्द झाला, पण आदिवासी पारधी समाजाच्या प्रगतीसाठी ठोस पावले उचलली गेली नाहीत, असा आरोप महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक बबन गोरामन यांनी केला आहे.
शिक्षणाचा अभाव, रोजगाराच्या संधींची कमतरता, सामाजिक भेदभाव आणि पोलिसांचा छळ यामुळे हा समाज आजही भटक्या जीवनशैलीवर अवलंबून आहे. मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निःस्वार्थी समाजसेवक अथक परिश्रम घेत आहेत. परंतु, या प्रयत्नांना आर्थिक आणि सामाजिक पाठबळाची नितांत गरज आहे.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी एका झटक्यात खोडून काढले तथाकथित अर्थतज्ज्ञांचे आरोप !
पारधी समाजातील उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी आता पुढे आले पाहिजे. तुम्ही समाजाचे सक्षम प्रतिनिधी आहात. तुमच्या यशामागे समाजाच्या मुळाशी असलेल्या संघर्षाची कहाणी आहे. आज समाजसेवक मर्यादित साधनसामग्रीसह समाजाच्या उत्थानासाठी झटत आहेत. त्यांना तुमच्या आर्थिक आणि सामाजिक पाठबळाची गरज आहे. तुमच्या छोट्या योगदानाने समाजसेवेचे हे प्रयत्न अधिक व्यापक आणि प्रभावी होऊ शकतात. खोट्या गुन्ह्यांमुळे त्रस्त असलेल्या समाजातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यासाठी उच्चशिक्षितांना पुढे येणे आज गरजेचे आहे.
Maharashtra politics : पत्ते खेळणाऱ्या कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची शक्यता !
खोट्या गुन्ह्यांविरुद्ध लढा, न्याय मिळवा..
महाराष्ट्रात चोरी, दरोडे किंवा खुनाच्या घटनांनंतर पारधी समाजाला संशयाच्या नजरेने पाहिले जाते. बेड्या – पाड्यांवरील निष्पाप लोकांना खोट्या गुन्ह्यांत अडकवले जाते. स्वातंत्र्याला 75 वर्षे उलटूनही हा अन्याय थांबलेला नाही. पारधी समाजातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी या सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा, पीडितांना कायदेशीर आणि आर्थिक मदत समाजातील काही युवक सरसावले आहेत. त्यांना अधिक ताकद देण्याची गरज आहे.
Preamble of Constitution : संविधान प्रस्तावनेत ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ कायमच राहणार !
प्रेरणादायी आदर्श: शिवबा, ज्योतिबा, बाबासाहेब..
छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांना स्वाभिमान शिकवला, ज्योतिबा फुलेंनी अंधश्रद्धा आणि भेदभाव दूर केला, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उपेक्षितांना जगण्याचा मार्ग दाखवला. या महान व्यक्तींच्या पावलावर पाऊल ठेवत पारधी समाजातील अधिकाऱ्यांनी समाजाला सक्षम बनवण्यासाठी पुढे यावे. तुमच्या एकजुटीने आणि योगदानाने पारधी समाज प्रगतीच्या शिखरावर दिमाखात उभा राहील, असे आवाहन समाजबांधवांकडून करण्यात आले आहे.








