Breaking

Tribal Pardhi : नागपुरात उद्यापासून पारधी न्याय संकल्प परिषद !

Pardhi Justice Sankalp Parishad from tomorrow in Nagpur at Ravi Bhavan : पारधी समाजाच्या 30 निवडक प्रकरणांची होणार सुनावणी

Nagpur : 14 एप्रिल रोजी नागपुरातील रविभवन येथे झालेल्या पारधी न्याय संकल्प परिषदेत 118 प्रकरणांवर चर्चा करण्यात आली होती. त्यांपैकी 30 निवडक प्रकरणांची सुनावणी उद्या 25 आणि 26 जून रोजी रविभवन येथे होणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त आयुषी सिंह, उपायुक्त डीगाबर चव्हाण आणि पारधी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते..

आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले की, पारधी समाजाच्या विविध समस्यांवर होणाऱ्या या सुनावणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत. सुनावणीदरम्यान संबंधित अधिकारी उपस्थित न राहिल्यास त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आयोगाने दिला आहे.

Vijay Wadettiwar : अबू आझमी आणि भाजप – एका नाण्याच्या दोन बाजू !

पारधी समाजावर होणारे अन्याय आणि अत्याचार रोखण्यासाठी अनुसूचित जाती-जमाती आयोग आणि आदिवासी विकास विभागाने पुढाकार घेतला आहे. आता पारधी समाजावर होणारे अन्याय सहन केले जाणार नाही. अत्याचार करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आयोगाने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

Devendra Fadnavis : मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांना मूळ विभागात जाण्यासाठी अल्टिमेटम

राज्यभरातून निवडलेल्या 30 प्रकरणांच्या सुनावणीसाठी आदिवासी पारधी विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष आतिश पवार, आदिवासी सेवक बबन गोरामन आणि अनिल पवार यांनी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम आणि आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड, नागपूर अपर आयुक्त आयुषी सिंह, उपायुक्त दिगंबर चव्हाण यांनी प्रयत्न केले. पारधी समाजाच्या न्यायासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे आतिश पवार म्हणाले.